फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात प्रत्येकालाच नैसर्गिक तेजस्वी त्वचा हवी असते. पण बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्समुळे त्वचेला हानी पोहोचते. अशावेळी ‘माचा’ हा एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. माचा हे जपानमधील उच्च गुणवत्तेचे ग्रीन टी पावडर असून त्यात अँटिऑक्सिडंट्स, क्लोरोफिल, व्हिटॅमिन A, C आणि E भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेला आतून पोषण देतं, इन्फ्लेमेशन आणि पिगमेंटेशन कमी करतं आणि चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो प्रदान करतं. चला तर जाणून घेऊया माचा वापरण्याचे काही सोपे आणि प्रभावी उपाय.
माचा फेस मास्क
एक चमचा माचा पावडरमध्ये अर्धा चमचा मध आणि एक चमचा अॅलोवेरा जेल मिसळा. हा पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावा आणि थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि डाग-धब्बे कमी होतात.
माचा स्क्रब
माचा पावडर, तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. हे मृत पेशी काढून टाकतं आणि त्वचा मऊ व उजळ बनवतं.
माचा आइस क्यूब्स
माचा टी बनवून ती आइस ट्रेमध्ये भरून गोठवा. दर सकाळी या बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्याला मसाज करा. त्यामुळे त्वचा ताजीतवानी, टाईट आणि फ्रेश दिसते.
माचा टोनर
एका कप उकळून थंड केलेल्या पाण्यात अर्धा चमचा माचा घालून स्प्रे बॉटलमध्ये भरा. दिवसातून दोनदा चेहऱ्यावर फवारल्यास त्वचा टोन होते आणि ताजेतवाने वाटते.
माचा डिटॉक्स ड्रिंक
दर सकाळी उपाशीपोटी एक कप माचा टी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा आतून हेल्दी राहते.
माचा-दही फेस पॅक
एका चमचा माचा आणि एका चमचा ताजे दही मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी धुवून टाका. हे टॅनिंग कमी करून चेहऱ्याला उजळपणा देतं.
माचा नाईट सीरम
एका चिमूट माचा पावडरमध्ये २–३ थेंब बदाम तेल मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मसाज करा. हे सीरम रात्री त्वचेची दुरुस्ती करतं आणि सकाळी चेहरा तेजस्वी दिसतो. माचा फक्त हेल्दी ड्रिंक नाही, तर तो एक शक्तिशाली स्किनकेअर घटक आहे. जर तुम्हालाही नैसर्गिक पद्धतीने ग्लोइंग आणि यंग स्किन हवी असेल, तर माचा आपल्या ब्युटी रूटीनमध्ये नक्की समाविष्ट करा.