फोटो सौजन्य - Social Media
JEE Main हा देशातील सर्वात स्पर्धात्मक इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. IIT, NIT किंवा IIIT सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. पण यश फक्त मेहनतीने नाही, तर योग्य स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगने मिळते. जर तुम्ही JEE 2026 ची तयारी करत असाल, तर खाली दिलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.
टाइम टेबल तयार करा
अभ्यासात सातत्य राखण्यासाठी टाइम टेबल अत्यावश्यक आहे. दिवसाचे प्रत्येक तास नियोजनबद्ध पद्धतीने विभागा. सकाळचा वेळ अवघड विषयांसाठी ठेवा आणि रात्रीचा वेळ पुनरावलोकनासाठी वापरा. आठवड्यातून एक दिवस फक्त रिव्हिजन आणि टेस्ट प्रॅक्टिससाठी ठेवा.
पुरेशी झोप घ्या
दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या. पुरेशी झोप न घेतल्यास एकाग्रता आणि स्मरणशक्ती दोन्ही कमी होतात. मेंदूला आराम दिल्याशिवाय नवीन माहिती दीर्घकाळ टिकत नाही.
फॉर्म्युला शीट तयार करा
फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांतील सर्व फॉर्म्युले एका वहीत किंवा शीटमध्ये नोंदवा. रंगीत पेनचा वापर करून विषयवार वेगळे करा. ही शीट रोज वाचा आणि प्रवासातही सोबत ठेवा.` त्यामुळे क्विक रिव्हिजन सोपे जाईल.
ॲक्टिव रिकॉल तंत्र वापरा
अभ्यास केलेले विषय पुन्हा पुस्तक न बघता आठवण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, फॉर्म्युला झाकून तो आठवा किंवा प्रश्न स्वतः सोडवा. हे तंत्र स्मरणशक्ती मजबूत करते आणि परीक्षेतील प्रश्न सोडवताना आत्मविश्वास वाढवते.
योग्य स्टडी मटेरियल निवडा
JEE तयारीसाठी NCERT पुस्तके हा सर्वात मजबूत पाया आहे. त्यानंतर तज्ज्ञ शिक्षकांनी सुचवलेल्या रेफरन्स बुक्स (जसे की H.C. Verma, R.D. Sharma, O.P. Tandon) वापरा. बेसिक कॉन्सेप्ट मजबूत असतील तर कठीण प्रश्न सुद्धा सोपे वाटतात.
नोट्स व्यवस्थित बनवा
स्वतःचे नोट्स रंगीत पेन, फ्लोचार्ट, आणि हायलाइटरच्या सहाय्याने तयार करा. छोटे पॉइंट्स, उदाहरणे आणि महत्वाचे समीकरणे यात समाविष्ट करा. हे नोट्स शेवटच्या आठवड्यात रिव्हिजनसाठी खूप उपयोगी ठरतात.
मॉक टेस्ट आणि टेस्ट सीरिज द्या
JEE Main सारख्या परीक्षेसाठी सराव हा यशाचा पाया आहे. आठवड्याला किमान एक मॉक टेस्ट द्या. त्यातून तुमच्या कमतरता ओळखा आणि त्या सुधारा. वेळेचे नियोजन कसे करायचे हेही मॉक टेस्टमधूनच शिकायला मिळते.
या सर्व टिप्स नियमितपणे पाळल्यास, तुमची JEE 2026 ची तयारी अधिक शिस्तबद्ध, आत्मविश्वासपूर्ण आणि परिणामकारक होईल. लक्षात ठेवा “Consistency is the key to success!”