
२० रुपयांमध्ये घरीच तयार करा नैसर्गिक बॉडी स्क्रबिंग! डेड स्किन निघून जाण्यासोबतच टॅनिंग होईल आठवडाभरात कमी
सुंदर दिसण्यासाठी कायमच त्वचेची काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर सतत क्रीम, लोशन लावणे तर कधी फेस सीरम लावून त्वचा चमकदार केली जाते. कामाच्या धावपळीमध्ये फक्त चेहऱ्याची काळजी घेतली जाते, पण शरीराकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. धूळ-माती, घाम आणि प्रदूषणामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. शरीरावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी वेगवेगळ्या बॉडी स्क्रबचा वापर केला जातो तर कधी महागड्या बॉडी पॉलिशिंग ट्रीटमेंट केल्या जातात. पण शरीर स्वच्छ करण्यासाठी सतत केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट पुढील आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. प्रत्येक महिलेला आपली त्वचा कायमच त्वचा सुंदर आणि तजेलदार हवी असते. यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण पार्लरमध्ये जाऊन महागडे उपाय करण्याऐवजी घरच्या घरीसुद्धा बॉडी स्क्रबिंग करु शकता. यामुळे त्वचा उजळदार होईल आणि शरीरावरील टॅन कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
व्हायरल चारकोल मास्क तुमच्या त्वचेसाठी घातक? तज्ज्ञांंचा इशारा
नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेले बॉडी स्क्रबिंग त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा कायमच निरोगी ठेवतात. नैसर्गिक घरगुती पदार्थांनी तयार केलेला स्क्रब त्वचा आतून स्वच्छ करतो. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि डेड स्किन कमी करण्यासाठी घरी बनवलेल्या स्क्रबचा वापर करावा. हा स्क्रब बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागते. घरगुती स्क्रबच्या वापरामुळे त्वचेला कोणतेही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया घरगुती स्क्रब बनवण्याची सोपी रेसिपी.
पिठीसाखर आणि तांदळाचे पीठ त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यास मदत करते. यामध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करते. डेड स्किन हळूवारपणे काढून टाकण्यासाठी बॉडी स्क्रबचा वापर करावा. बीटच्या पावडरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेला काळेपणा कमी होतो आणि त्वचा स्वच्छ राहते. याशिवाय त्वचेवर नैसर्गिक गुलाबी तेज येते. मध आणि खोबरेल तेलाच्या वापरामुळे त्वचा नैसर्गिक मॉइश्चराज होते. त्यामुळे अंघोळीच्या आधी बॉडी स्क्रबचा वापर करावा.