Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच

महाराष्ट्रातील वन्यजीव पर्यटनाला चालना देण्यासाठी आयआरसीटीसी पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र वन विभागाने सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमांतर्गत पर्यटकांसाठी रेल्वे तिकीट, निवास, स्थानिक वाहतूक आणि वन्यजीव सफारीचा समावेश असलेली विशेष पर्यटन पॅकेजेस लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 10:54 AM
आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच

Follow Us
Follow Us:
  • आयआरसीटीसी आणि महाराष्ट्र वन विभागामध्ये शाश्वत वन्यजीव पर्यटनाच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या.
  • पेंच, ताडोबा-अंधारी, बोर, नवेगाव-नागझिरा, उमरेड-करहांडला आणि टिपेश्वर अभयारण्यांचा पर्यटन पॅकेजमध्ये समावेश.
  • पॅकेजमध्ये रेल्वे तिकीट, निवास, स्थानिक वाहतूक आणि हमीदार वन्यजीव सफारी परवाना अशा अनेक सुविधा पुरवल्या जातील.
भारतात शाश्वत वन्यजीव पर्यटनाला चालना देण्यासाठी आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबई आणि महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने हातमिळवणी करत सामंजस्य करार केला आहे. या दोन्ही संस्थांमध्ये वन्यजीव पर्यटनाच्या संयुक्त विकास व प्रसारासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. हा महत्त्वाचा सामंजस्य करार नुकताच नागपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. करारावर महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव एम. श्रीनिवास रेड्डी आणि आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक बरव झा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैस्कर तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव, आयआरसीटीसीचे अति. महाव्यवस्थापक हर्षवर्धन सिंह रावत, व्यवस्थापक सुभाष नायरयांची प्रमुख उपस्थिती होती.

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट

पॅकेजमध्ये ‘या’ स्थळांचा समावेश

  • पेंच राष्ट्रीय उद्यान
  • ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
  • बोर व्याघ्र प्रकल्प
  • नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
  • उमरेड करहांडला वन्यजीव अभयारण्य
  • टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य
लवकरच ‘पर्यटन पॅकेजेस’ सुरू

देशातील अशा प्रकारच्या पहिल्या उपक्रमांपैकी हा एक आहे. आयआरसीटीसीचे विस्तृत रेल्वे जाळे आणि पर्यटन कौशल्य यांची सांगड महाराष्ट्र वन विभागाच्या संवर्धन उपक्रमांशी घातली जाणार आहे. लवकरच महाराष्ट्र वन्यजीव पर्यटन पॅकेजेस’ सुरू करणार आहे. यामध्ये निश्चित रेल्वे तिकीट, निवास, स्थानिक वाहतूक आणि हमीदार वन्यजीव सफारी परवाने समाविष्ट असतील. ही पॅकेजेस वन्यजीवाप्रेमी, छायाचित्रकार, पक्षी निरीक्षक, कुटुंबे, पर्यटकांसाठी तयार करण्यात आली आहे.

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागातील समूह महाव्यवस्थापक गौरव झा म्हणाले की, “समूह महाव्यवस्थापक हा करार महाराष्ट्रातील शाश्वत वन्यजीव पर्यटनासाठी 66 महत्वाचे पाऊल आहे. यामुळे पर्यटकांना सुलभ प्रवेश मिळेल आणि जबाबदार पर्यटनाला बळकटी मिळेल. या भागीदारीमुळे वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृत्ती वाढेल, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि महाराष्ट्र देशातील अग्रगण्य वन्यजीव पर्यटन स्थळ म्हणून पुढे येईल”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Maharashtra wildlife tourism irctc forest department safari packages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • IRCTC
  • IRCTC Tour Package
  • travel news

संबंधित बातम्या

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट
1

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट

IRCTC Website Upgrade: ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली! आयआरसीटीसी वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स; पाहा काय आहेत नवे नियम?
2

IRCTC Website Upgrade: ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली! आयआरसीटीसी वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स; पाहा काय आहेत नवे नियम?

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…
3

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित
4

राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.