उत्तम आरोग्यासाठी जेवणात तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा कोशिंबीर खाणे कधीही चांगले. कोशिंबीरमध्ये असलेले प्रोटीन शरीराला पोषक अन्न देते. त्यामुळे डॉक्टरसुद्धा दररोजच्या जेवनात कोशिंबीर खावी, असा सल्ला देतात.
साहित्य
२ गाजरं किसलेली
२ कोवळ्या काकड्या बारीक चिरलेल्या
१ मोठा टोमॅटो बिया काढून बारीक चिरलेला
थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली
अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे ऐच्छिक
१ टेबलस्पून दाण्याचं कूट
पाव टीस्पून तिखट
अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
२ टीस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग
कृती
सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट, तिखट, मीठ, साखर घाला. कोथिंबीर घाला. नीट एकजीव करा. एका लहान कढलीत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडली की त्यात हिंग घाला, लगेचच गॅस बंद करा. ही फोडणी कोशिंबिरीवर ओता. या कोशिंबिरीबरोबर मी आज काळ्या वाटाण्याची आमटी, वांग्याचे काप, मेथीची भरडा भाजी, दोडक्याची भाजी केलं होतं. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हवं ते करा.
Web Title: Make a quick healthy salad during monsoons nrrd