घरातील जीवाभावाच्या माणसांसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनवा केमिकल फ्री पारंपरिक उटणं
दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारतात सर्वच सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केले जातात. सणांच्या दिवशी घरात सुंदर रांगोळी, दिव्यांची आरास, फराळातील पदार्थ इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. यासोबतच पारंपरिक पद्धतीने दिवाळी सण साजरा केला जातो. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान केले जाते. याशिवाय सकाळी लवकर उठून उटणं लावून अंघोळ केली जाते. त्यानंतर कारटी पायाच्या अंगठ्याने फोडले जाते. बाजारात अनेक वेग्वेगळ्या ब्रेडचे उटणं उपलब्ध आहेत.उटणं बनवताना वेगवेगळ्या केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पारंपरिक उटणं बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. घरी बनवलेलं उटणं चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होईल.(फोटो सौजन्य – pinterest)
जया किशोरी त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावतात ‘हा’ ब्युटी स्प्रे, दीर्घकाळ दिसाल तरुण
उटणं बनवताना वेगवेगळ्या सुगंधी वनस्पतीचा वापर केला जातो. अगरू, चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी पदार्थ वापरून उटणं बनवले जाते. हे उटणं अंगाला लावल्यामुळे त्वचेवर चमक येते, शरीरावरील त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. औषधी गुणधर्मानी समृद्ध असलेले उटणं त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार करते. पण हल्ली उटणं बनवताना कापूरकाचऱ्या, बावची, गुलाबाच्या पाकळ्या, वाळ्याची मुळे, हळद, अर्जुन वृक्षाची साल इत्यादी पदार्थांचा वापर करून उटणं तयार केले जाते.तयार केलेले उटणं दुधात किंवा तिळाच्या तेलात भिजवून संपूर्ण शरीरावर लावले जाते. उटणं लावल्यानंतर त्वचा हलक्या हाताने घासल्यास त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कमी होईल.
उटणं लावल्यामुळे त्वचा अधिकच मऊ आणि चमकदार होते. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक कायमच टिकून राहते. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा औषधी उटणं चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावे. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर घाण कमी होते. वाळा, कापूर आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केल्यामुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहण्यास मदत होते.
उटणं बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ पीठ, आवळकाठी, सरीवा, वाळा, नागरमोथा, जेष्ठमधसुगंधी, कचोरा, आंबेहळद, तुलसी पावडर, मंजीष्टा, कापूर घेऊन बारीक वाटून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उटणं. घरी बनवलेले उटणं खोबऱ्याच्या दुधात किंवा खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावावे. यामुळे त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावरील चमक वाढते.