घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा चॉकलेट- खजूर मिठाई
दिवाळीमध्ये सगळीकडे मोठा आनंद आणि उत्साह असतो. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये घरात पाहुण्यांची उठाबस केली जाते. तसेच दिवाळीच्या काही दिवस आधी साफसफाई, फराळ, नवीन कपड्यांची खरेदी इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. शिवाय घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा सुंदर गिफ्टस दिले जातात. पाहुणे किंवा घरातील इतर नातेवाईक घरी येतात मिठाई आणि चॉकलेट किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टी आणल्या जातात. तसेच घरात त्यांच्या स्वागतासाठी गोड पदार्थ बनवले जातात. अनेकदा घरी आलेल्या पाहुण्यांना गोड पदार्थ काय द्यावं? हा प्रश्न पडल्यानंतर काय द्यावं हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना चॉकलेट खाण्यास देऊ शकता. चॉकलेट हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चॉकलेट- खजूर मिठाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे चॉकलेट आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे. तसेच मधुमेहाचे रुग्ण सुद्धा या चॉकलेटचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया चॉकलेट- खजूर मिठाई बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा रुचकर गरमागरम पुलाव, वाचा सिंपल रेसिपी
हे देखील वाचा: सकाळचा नाश्ता होईल आणखीन स्वादिष्ट, नाश्त्यामध्ये बनवा चमचमीत दलिया आप्प्पे