Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Bonus: आनंदाची बातमी ! दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर

अखेर, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती आनंदाची बातमी समोर आली. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्याचा

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 25, 2025 | 10:54 PM
दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर

दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ₹४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार गटाला जोरदार झटका! ‘या’ बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

निधी किती मंजूर?

या योजनेसाठी शासनाने ₹४०.६१ कोटी (₹४० कोटी ६१ लाख ३० हजार) इतका निधी मंजूर केला आहे. हा निधी एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित केला जाणार आहे.

जबाबदारी कोणाकडे?

भाऊबीज भेट वेळेवर मिळावी म्हणून, निधीचे वितरण एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या मार्फत केले जाणार आहे. जिल्हास्तरीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली लाभार्थ्यांना रक्कम वेळेत पोहोचवली जाईल.

या निर्णयामुळे Anganwadi Sevika Bhaubij Gift 2025 लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. शासनाने नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीनंतर हा आदेश जारी केला आहे. या भाऊबीज गिफ्ट मुळे मुळे अंगणवाडी सेविकांच्या कामाचा सन्मान होईल आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल अशी आशा आहे.

दरम्यान, अंगणवाडी सेविकांसाठी इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण अपेक्षित आहे, पण डीएड, पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणी, महिलांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. दुसरीकडे मदतनीस पदासाठी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे, तरीपण या पदासाठी बारावी, पदवीप्राप्त तरुणी-महिलांनी अर्ज केल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात विधवा, परितक्त्या महिलांचाही समावेश आहे. शैक्षणिक कागदपत्रांनुसार उमेदवारांना १०० गुण दिले जातात. त्यात पूर्वी कोठे अध्यापन किंवा काम केल्याचा अनुभव असल्यास त्यालाही स्वतंत्र गुण आहेत. आता अर्ज करण्याची मुदत संपली असून सध्या अर्जांची छाननी व कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.

Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

Web Title: Occasion of diwali a gift worth rs 1000 has been announced for anganwadi workers and helpers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 10:54 PM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • Diwali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.