
ओव्हन- केक मोल्डमचा वापर न करता लहान वाट्यांमध्ये बनवा स्वादिष्ट कप केक
आज संपूर्ण जगभरात नाताळ सणाचा मोठा उत्साह आहे. यादिवशी घरात अनेक नवनवीन गोड पदार्थ बनवले जातात. त्यात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे केक. चॉकलेट केक, कप केक, रेड व्हेल्वेट केक इत्यादी अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडतो. केक बनवण्यासाठी केक टिन किंवा मोल्ड लागतो. पण बऱ्याचदा घरात केक मोल्ड किंवा केकचा साचा उपलब्ध नसतो. अशावेळी तुम्ही घरातील लहान लहान वाट्यांचा वापर करून कप केक बनवू शकता. केक बनवण्यासाठी कोणत्याही महागड्या केक मोल्ड किंवा केक साच्याची अजिबात आवश्यकता भासणार नाही. कामाच्या धावपळीमुळे प्रत्येकालाच कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ हवे असतात. यामुळे वेळही वाचतो. याशिवाय घरात मसाल्याचे लहान डबे सुद्धा उपलब्ध असतात. याच लहान डब्यांचा वापर करून तुम्ही कप केक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया इन्स्टंट कप केक बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)