साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम
दक्षिण भारतात बनवले जाणारे सर्वच पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. सुगंधी आणि चविष्ट मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. जगभरातील लाखोंच्या संख्येने पर्यटक जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी दक्षिण भारतात येतात. तिथे बनवले जाणारे गोड, तिखट आणि इतर पदार्थांची चव कायमच सुंदर लागते. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने मुगडाळ पायसम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुगाची डाळ सहज पचन होते. याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांपासून पायसम बनवले जातात. गुळाचा वापर करून बनवलेले चविष्ट पायसम लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.हा पदार्थ अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी फरार खान यांच्यासाठी बनवला होता. चला तर जाणून घेऊया मुगडाळ पायसम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
५ मिनिटांमध्ये घरी बनवा केरळस्टाईल जाळीदार सॉफ्ट अप्पम, झटपट तयार होतील सकाळचा नाश्ता