Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : लहान मुलं हट्ट करतायेत? मग विकत नाही, घरीच बनवा देसी स्टाईल ‘व्हेज बर्गर’

Veg Burger Recipe : संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी जर तुुम्ही टेस्टी पदार्थाच्या शोधात असाल तर व्हेज बर्गर तुमच्यालाठी चांगला पर्याय आहे. ही रेसिपी फाॅलो करुन तुम्ही अगदी मार्केट स्टाईल व्हेज बर्गर तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 09:25 AM
Recipe : लहान मुलं हट्ट करतायेत? मग विकत नाही, घरीच बनवा देसी स्टाईल 'व्हेज बर्गर'

Recipe : लहान मुलं हट्ट करतायेत? मग विकत नाही, घरीच बनवा देसी स्टाईल 'व्हेज बर्गर'

Follow Us
Follow Us:
  • लहानांपासून मोठ्यांपर्यंत व्हेज बर्गर सर्वांच्या आवडीचा.
  • हा बर्गर तुम्ही घरी देखील बनवू शकता.
  • व्हेज बर्गरची रेसिपी जाणून घ्या.
व्हेज बर्गर हा हलका, पौष्टिक आणि सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा लोकप्रिय फास्ट फूड पदार्थ आहे. बाजारात सहज उपलब्ध असला तरी घरच्या घरी ताज्या भाज्या, कमी मसाले आणि आपल्या आवडीनुसार साहित्य वापरून तयार केलेला व्हेज बर्गर अधिक चवदार आणि आरोग्यदायी ठरतो. घरी बर्गर बनवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता आणि प्रमाण आपण स्वतः ठरवू शकतो. संध्याकाळचा नाश्ता, मुलांच्या डब्यासाठी किंवा छोट्या गेट-टुगेदरसाठी व्हेज बर्गर हा उत्तम पर्याय आहे. ही सोपी रेसिपी अगदी नवशिक्यांनाही सहज करता येते. काही मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा हा व्हेज बर्गर घरातील सर्वांनाच नक्की आवडेल. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य

टिक्कीसाठी:

  • २ उकडलेले बटाटे
  • ¼ कप उकडलेले हिरवे मटार
  • २ टेबलस्पून किसलेले गाजर
  • २ टेबलस्पून ब्रेडक्रम्ब्स
  • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • ½ टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • २ टीस्पून तेल
बर्गरसाठी:
  • ४ बर्गर बन
  • ४ लेट्यूसची पाने किंवा कोबीची पाने
  • १ टोमॅटो (गोल काप)
  • १ कांदा (गोल काप)
  • २–३ चीज स्लाईस (ऑप्शनल)
  • टोमॅटो सॉस
  • मेयोनेझ किंवा व्हेज बर्गर सॉस
  • बटर
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश

कृती

  • उकडलेले बटाटे, मटार, गाजर, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि ब्रेडक्रम्ब्स एकत्र करून मऊ मिश्रण तयार करा.
  • या मिश्रणाचे समान आकाराचे गोल किंवा अंडाकृती टिक्की बनवा आणि १०–१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा, त्यामुळे टिक्की तळताना फुटणार नाही.
  • तव्यावर थोडे तेल गरम करून टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा.
  • बर्गर बन आडवे कापून त्यावर हलके बटर लावा आणि तव्यावर १–२ मिनिटे भाजून घ्या.
  • बनच्या खालच्या भागावर मेयोनेझ किंवा बर्गर सॉस लावा. त्यावर लेट्यूस किंवा कोबीचे पान ठेवा आणि तयार टिक्की ठेवा.
  • टिक्कीवर चीज स्लाईस (ऑप्शनल), कांद्याचे काप, टोमॅटोचे काप आणि थोडा टोमॅटो सॉस घाला.
  • बनचा वरचा भाग ठेवून हलके दाबा. गरमागरम व्हेज बर्गर फ्रेंच फ्राईज, चिप्स किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. हा साधा पण चविष्ट बर्गर घरातील प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल.

Web Title: Make market style tasty veg burger at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
1

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.