Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

Methi Thalipeeth Recipe : आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर मेथी आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायद्याची ठरते. तुम्ही नाश्त्यात मेथीचे खमंग थालीपीठ तयार करू शकता जे चवीसह सकाळच्या वेळेत तुम्हाला ऊर्जाही प्रदान करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 09, 2026 | 09:38 AM
आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर... सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले 'मेथीचे थालीपीठ'

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर... सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले 'मेथीचे थालीपीठ'

Follow Us
Follow Us:
  • मेथीचे थालीपीठ हिवाळ्यात शरीराला ऊर्जा मिळवून देतात.
  • पौष्टिकतेसहच हे थालीपीठ चवीलाही फार अप्रतिम लागतात.
  • सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी ही रेसिपी परफेक्ट ठरेल.
महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत थालीपीठाला एक विशेष स्थान आहे. वेगवेगळ्या धान्यांच्या पिठांपासून बनवलेले थालीपीठ हे पौष्टिक, पोटभरू आणि चवीला अप्रतिम असते. त्यातच जर ताज्या हिरव्या मेथीची भर घातली, तर त्याचा स्वाद आणि आरोग्यदायी गुणधर्म दुप्पट होतात. मेथी ही आयुर्वेदात औषधी मानली जाते. ती पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवते.

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

थंडीच्या दिवसांत किंवा हलक्या पण सकस नाश्त्यासाठी मेथीचे थालीपीठ हा उत्तम पर्याय आहे. सकाळच्या नाश्त्याला, डब्यासाठी किंवा रात्री हलक्या जेवणासाठीही हे थालीपीठ योग्य ठरते. लोणी, दही किंवा घरगुती ठेच्यासोबत खाल्ले की याची चव अजून खुलून येते. आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारी पारंपरिक मेथी थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत.

 साहित्य

  • 1 कप ज्वारीचे पीठ
  • ½ कप बाजरीचे पीठ
  • ½ कप तांदळाचे पीठ
  • 1 कप बारीक चिरलेली ताजी मेथी
  • 1 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
  • 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • 1 चमचा जिरे
  • 1 चमचा तीळ
  • ½ चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट (चवीनुसार)
  • मीठ चवीनुसार
  • 1–2 चमचे तेल
  • गरजेनुसार कोमट पाणी
अस्सल गावराण चवीची झणझणीत ‘शेवभाजी’ कशी तयार करायची? अवघ्या 10 मिनिटांची आहे रेसिपी!

 कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात सर्व पिठे एकत्र घ्या.
  • त्यात चिरलेली मेथी, कांदा, हिरव्या मिरच्या, जिरे, तीळ, हळद, तिखट आणि मीठ घाला.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा.
  • थोडे थोडे कोमट पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. पीठ फार घट्ट किंवा फार सैल नसावे.
  • पीठ झाकून 10–15 मिनिटे विश्रांतीस ठेवा.
  • तवा मध्यम आचेवर गरम करा. हाताला पाणी लावून पीठाचा गोळा तव्यावर थापून गोल थालीपीठ बनवा.
  • वरून थोडे तेल सोडा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
  • गरमागरम मेथी थालीपीठ तयार आहेत!
  • मेथीचे थालीपीठ दही किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत चवीला फार छान लागेल.

Web Title: Make tasty and nutritious methi thalipeeth at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
4

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.