Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची मजा आणखीनच वाढेल, मसालेदार स्टफिंग अन् खमंग चवीने भरलेली ‘भरली मिरची’; 10 मिनिटातच तयार होईल रेसिपी

Bharli Mirchi Fry Recipe : ही भरली मिरची तुमच्या जेवणात खासपणा आणेल. पारंपरिक चव, मसाल्यांचा सुगंध आणि मिरचीचा तिखटपणा या सर्वांचा परिपूर्ण मिलाफ या डिशला आणखीन खास बनवतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 01, 2025 | 03:40 PM
जेवणाची मजा आणखीनच वाढेल, मसालेदार स्टफिंग अन् खमंग चवीने भरलेली 'भरली मिरची'; 10 मिनिटातच तयार होईल रेसिपी

जेवणाची मजा आणखीनच वाढेल, मसालेदार स्टफिंग अन् खमंग चवीने भरलेली 'भरली मिरची'; 10 मिनिटातच तयार होईल रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत भरली मिरची फार लोकप्रिय
  • स्टफिंगने भरलेली ही मिरची शॅलो फ्राय करून तयार केली जाते
  • कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी चवीला फार छान लागते
भारतीय स्वयंपाकात मिरचीचं एक वेगळं स्थान आहे. ती केवळ तिखटपणासाठीच नाही तर चवीला उठाव देण्यासाठीही ओळखली जाते. महाराष्ट्रात मिरचीचा वापर विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो, मग ती ठेचा असो, लोणचं असो किंवा भाजी. पण आज आपण एक खास, पारंपरिक आणि घराघरात लोकप्रिय असलेली रेसिपी पाहणार आहोत ज्याचे नाव आहे भरली मिरची. ही भाजी तिखट, मसालेदार आणि सुगंधी असते, जी गरम पोळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते.

Egg Recipe : तुम्ही कधी अंडा तवा फ्राय खाल्ला आहे का? नसेल तर ही आगळीवेगळी झणझणीत रेसिपी कुटुंबाला नक्की खाऊ घाला

भरली मिरची ही रेसिपी केवळ स्वादिष्ट नाही, तर बनवायलाही सोपी आहे. ह्यात हिरव्या मिरच्या मसालेदार सारणाने भरून त्या थोड्या तेलात परतल्या जातात. काही जण त्यात खोबरे, शेंगदाणे, वेलची किंवा थोडी गोडीही घालतात. ही भाजी विशेषतः उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात पोळीसोबत खाल्ली जाते. चला तर मग जाणून घेऊया ही तोंडाला पाणी सुटणारी भरली मिरची बनवण्याची पारंपरिक पद्धत.

साहित्य :

  • हिरव्या मोठ्या मिरच्या – 10 ते 12
  • शेंगदाणे – ½ कप (भाजून सोलून कुटून घ्या)
  • किसलेले सुके खोबरे – ¼ कप
  • जिरे – 1 टीस्पून
  • धणेपूड – 1 टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • चिंच-गूळ – 1 टेबलस्पून (ऑप्शनल)
  • तेल – 3 ते 4 टेबलस्पून
कार्तिकी एकादशीच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा शेंगदाण्याचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या पुसा. त्यांच्या एका बाजूने लांबीने हलकी चिरा द्या आणि आतले बी काढून टाका.
  • एका तव्यावर थोडं तेल गरम करा. त्यात किसलेले खोबरे, जिरे, धणेपूड, आणि भाजलेले शेंगदाणे टाका. हे थोडं परतून घ्या आणि मग त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि इच्छेनुसार चिंच-गूळ घाला. सर्व घटक एकत्र करून मसाला थंड होऊ द्या.
  • थंड झालेला मसाला मिक्सरमध्ये थोडा जाडसर वाटून घ्या.
  • प्रत्येक मिरचीत हा तयार मसाला नीट भरून घ्या. मिरची फुटू नये म्हणून हळूवार हाताळा.
  • एका तव्यात किंवा कढईत तेल गरम करा. त्यात भरलेल्या मिरच्या सावकाश ठेवा आणि मंद आचेवर झाकण ठेवून परता.
  • मिरच्या खाली चिकटू नयेत म्हणून थोड्या थोड्या वेळाने हलक्या हाताने उलटून घ्या. त्या नीट परतून सोनेरी झाल्या की गॅस बंद करा.
  • गरमागरम भरली मिरची पोळी, भाकरी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा. हवी असल्यास वर थोडं लिंबू पिळा, चव अधिक खुलते.
  • जास्त तिखट मिरच्या वापरल्यास मसाल्यात गूळ आणि चिंच घातल्याने चव संतुलित होते.
  • तेल थोडं जास्त वापरल्यास मिरच्या छान कुरकुरीत होतात आणि जास्त दिवस टिकतात.

Web Title: Make tasty and spicy bharli mirchi at home note down marathi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • chili
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

उरलेल्या चपात्या फेकू नका, शिळ्या चपात्यांपासून अवघ्या 5 मिनिटांतच बनवा ‘कुरकुरीत चिवडा’
1

उरलेल्या चपात्या फेकू नका, शिळ्या चपात्यांपासून अवघ्या 5 मिनिटांतच बनवा ‘कुरकुरीत चिवडा’

Winter Recipe : हिवाळ्यात गाजराचा हलवा बनवलात की नाही? जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Winter Recipe : हिवाळ्यात गाजराचा हलवा बनवलात की नाही? जाणून घ्या सोपी रेसिपी

पालक खायला आवडत नाही, मग यापासून बनवा कुरकुरीत आणि चटपटीत चाट; चव चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
3

पालक खायला आवडत नाही, मग यापासून बनवा कुरकुरीत आणि चटपटीत चाट; चव चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा ‘ख्रिसमस केक’
4

Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा ‘ख्रिसमस केक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.