Have You Ever Try Anda Tawa Fry Know The Recipe In Marathi
Egg Recipe : तुम्ही कधी अंडा तवा फ्राय खाल्ला आहे का? नसेल तर ही आगळीवेगळी झणझणीत रेसिपी कुटुंबाला नक्की खाऊ घाला
Egg Tawa Fry Recipe : अंड्यापासून अनेक चविष्ट पदार्थ तयार केले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी अंडा तवा फ्रायची चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. मसालेदार आणि खमंग भाजून बनवलेली ही डिश चवीला फार छान लागते.
मागील काही काळापासून अंडा तवा फ्राय रेसिपी फार ट्रेंडमध्ये आहे
अंड्याची ही रेसिपी चवीला झणझणीत लागते
तुम्ही फार कमी वेळेत झटपट ही रेसिपी तयार करू शकता
अंड्याच्या पदार्थांमध्ये विविधता असते आणि प्रत्येकाची चव वेगळीच असते. त्यातला एक अतिशय लोकप्रिय आणि झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे अंडा तवा मसाला. हा पदार्थ रस्त्यावरच्या ढाब्यांवर आणि हॉटेलमध्येही सहज मिळतो. उकडलेली अंडी मसालेदार ग्रेव्हीत तव्यावर शिजवून तयार केली जातात. लालसर मसाला, कांदा-टोमॅटोची जाडसर ग्रेव्ही आणि त्यावर शिजलेली अंडी यामुळे या डिशची चव लज्जतदार लागते. हा पदार्थ खासकरून रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात चपाती, पराठा किंवा पावाबरोबर खायला अतिशय योग्य आहे. जर तुम्हाला मसालेदार आणि सुगंधी पदार्थ आवडत असतील, तर अंडा तवा मसाला तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. चला तर पाहूया या चविष्ट रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.