Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणात खा हलका फुलका पदार्थ, नक्की बनवून पहा ‘व्हेजिटेबल ओट्स सूप’

रात्रीच्या जेवणात नेमका काय पदार्थ बनवावा हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही व्हेजिटेबल ओट्स सूप बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी सोपा आणि कमीत कमी वेळात तयार होतो. लहान मुलं अनेकदा भाज्या खाण्यास नकार देतात अशावेळी तुम्ही मुलांना भाज्यांपासून तयार केलेले सूप खाण्यासाठी देऊ शकता. तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा व्हेजिटेबल ओट्स सूप गुणकारी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2024 | 01:06 PM
रात्रीच्या जेवणात नक्की बनवून पहा व्हेजिटेबल ओट्स सूप

रात्रीच्या जेवणात नक्की बनवून पहा व्हेजिटेबल ओट्स सूप

Follow Us
Follow Us:

रात्रीच्या जेवणात प्रामुख्याने पचनास हलका आणि आरोग्यसाठी फायदेशीर ठरेल असा पदार्थ बनवला जातो. रोज रोज नेमकं काय जेवण बनवावे हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल ओट्स सूप बनवू शकता. हे सूप आरोग्यसाठी गुणकारी ठरेल. वाढलेले वजन कमी करण्यासाठी ओट्स खाल्ले जातात. पण सतत तेच तेच ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही हे सूप नक्की बनवू शकता. या सूपमध्ये असलेल्या भाज्यांमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. सूप हा पदार्थ लवकर तयार होत असल्याने अनेकांना सूप बनवला आवडते.रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल ओट्स सूप हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया व्हेजिटेबल ओट्स सूप बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • ऑलिव्ह ऑईल
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीरीचे देठ
  • कांदा
  • ओट्स
  • सर्व प्रकारच्या मिक्स भाज्या
  • काळीमिरी पावडर
  • हिरवा कांदा
  • कोथिंबीर
हे देखील वाचा: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित गंभीर आजार

रात्रीच्या जेवणात नक्की बनवून पहा व्हेजिटेबल ओट्स सूप

कृती:

  • व्हेजिटेबल ओट्स सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल टाकून गरम करण्यासाठी ठेवा.
  • तेल गरम झाल्यानंतर त्यात आलं लसूणची पोस्ट टाकून कांदा आणि कोथिंबिरीचे देठ घालून हलकेसे परतून घ्या.
  • कढईमधील कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. कांदा भाजताना गॅस बारीक ठेवा, जेणेकरून कांदा जास्त भाजला जाणार नाही.
  • कांदा सोनेरी झाल्यानंतर त्यात अर्धा वाटी ओट्स टाकून मिक्स करून घ्या.
  • ओट्स थोडे शिजल्यानंतर त्यात भाज्या घालून परतून घ्या. या भाज्यांमध्ये दीड ग्लास पाणी टाकून मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर सूपला उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, चिरलेली कोथिंबीर घालून २० मिनिटं होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या.
  • त्यानंतर तयार आहे ‘व्हेजिटेबल ओट्स सूप’. हे सूप प्यायल्याने सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो.

Web Title: Make vegetable oats soup at home for dinner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 12:48 PM

Topics:  

  • dinner recipe
  • healthy recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.