मराठी साहित्यिक कवी 'कुसुमाग्रज' यांचा जन्म कधी झाला?
27 फेब्रुवारीला राज्यभरात सगळीकडे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेविषयी प्रेम आणि आदर वाढवण्यासाठी या दिवशी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषेविषयी कितीही वाचले किंवा ऐकले तरी ते कमीच आहे. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा बोलणारे लोक राहतात. याशिवाय आपल्यातील अनेकांना मराठी साहित्य वाचण्यास अतिशय आवडते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे नाव म्हणजे कवी कुसुमाग्रज. कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेले साहित्य भारतासह जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, समीक्षक, नाटककार आणि कथाकार अशी कवी कुसुमाग्रजांची ओळख आहे.
२७ फेब्रुवारीला का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या इतिहास आणि मराठी भाषेचे महत्व
सामाजिक लेखक म्हणून ओळखले जाणारे कुसुमाग्रज हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत. वि. स.खांडेकरांच्या साहित्यानंतर नाचा पुरस्कार प्राप्त करणारे हे दुसरे साहित्यिक आहेत. म्हणून त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेसाठी त्यांची खूप मोठी ख्याती आहे. आज आम्ही तुम्हाला कुसुमाग्रजांचा जन्म नेमका कुठे झाला? त्याचे मराठी साहित्य? इत्यादी विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला नाशिकमध्ये झाला. कवी कुसुमाग्रज यांचे मूळ विष्णू वामन शिरवाडकर हे आहेत. तसेच कुसुमाग्रजांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. गजानन शिरवाडकर यांचे काका विष्णू शिरवाडकर यांनी कुसुमाग्रजांना दत्तक घेतले होते. त्यानंतर त्यांचे नाव बदलण्यात आले. विष्णूंना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक बहीण होती. तिचा भाऊ म्हणजेच कुसुम अग्रज म्हणून त्यांनी त्यांचे टोपण नाव ‘कुसुमाग्रज’ असे ठेवले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगावला तर माध्यमिक शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी पुढील मॅट्रिक शिक्षण मुंबई विद्यापीठातून केले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. ‘रत्नाकर’ नावाच्या मासिकातून कुसुमाग्रज यांची पहिली कविता प्रसिद्ध करण्यात आली.
कवी कुसुमाग्रजांचे खूप मोठे साहित्य आहे. त्यांनी मराठी भाषेमध्ये अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या कविता, कथा, नाटकांविषयी लिहताना शब्द अपुरे पडतील एवढे मोठे साहित्य आहे. अजूनही त्यांच्या अनेक कविता सगळ्यांच्या ओठी असतात. त्यांच्या कवितांमुळे अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळते. चला तर जाणून घेऊया कुसुमाग्रज यांच्या कवितांबद्दल सविस्तर माहिती.
कुसुमाग्रजांच्या अनेक कविता खूप कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. आजही त्यांचे कविता संग्रह अभ्यासले जातात. अक्षरबाग (1999),किनारा(1952), चाफा(1998),छंदोमयी (1982),जाईचा कुंज (1936),जीवन लहरी(1933),थांब सहेली (2002),पांथेय (1989),प्रवासी पक्षी (1989),मराठी माती (1960),महावृक्ष (1997, माधवी(1994), मारवा (1999), मुक्तायन (1984. मेघदूत(1954), रसयात्रा (1969),वादळ वेल (1969),विशाखा (1942),श्रावण (1985),समिधा (1947),स्वगत(1962), हिमरेषा(1964)
मराठी भाषा गौरव दिन: एक सूर एक ध्यास छेडितो मराठी, एक संघ एक बंध गुंजीतो मराठी
शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा (1947), कौंतेय (1953), आमचं नाव बाबुराव (1966), ययाति आणि देवयानी (1966), वीज म्हणाली धरतीला (1970), नटसम्राट (1971) यांचा समावेश होतो. दूरचे दिवे (1964), वैजयंती (1950), राजमुकुट (1954), ऑथेल्लो (1961) व बेकेट (1971) ही त्यांची प्रसिद्ध झालेली नाटक आहेत. तर त्यांनी अनेक कथा संग्रह सुद्धा लिहिले होते. अंतराळ, अपाईंमेंट, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाली, एकाबारा निवडक कथा, सतारीचे बोल इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.