
दात दुखीची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे दातांचे आरोग्य बिघडून जाते. सतत तेलकट, चिकट, गोड किंवा चावण्यास कठीण असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे दात अस्वच्छ दिसू लागतात. दातांवर पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा चिकट थर साचून राहणे किंवा दातांना कीड लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दातांना कीड लागल्यानंतर तोंडामधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. शिवाय अनेकदा जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्यानंतर दात स्वच्छ केले नाहीतर हिरड्यांचे आरोग्य बिघडून जाते.
खराब झालेल्या दातांमुळे हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटू लागते. तर काहींचे दात पांढरे नसून अधिक पिवळे होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दातांवर साचून राहिलेला पिवळ्या रंगाचा खराब थर आणि कीड नष्ट करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे दातांवरील पिवळा थर कमी होऊन दात स्वच्छ आणि पांढरे शुभ्र दिसतील.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
दात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकदा असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक पेनकिलरच्या गोळ्या घेतात. मात्र सतत पेनकिलरच्या गोळ्या खाण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. घरगुती उपाय केल्यामुळे वेदनांपासून आराम मिळेल आणि दात स्वच्छ होतील. दातांना लागलेली कीड कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध खावीत. सोबतच घरगुती उपाय सुद्धा करावेत. दात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर मोहरीच्या तेलात मीठ मिक्स करून दातांवर लावावे. यामुळे दातांमधील कीड नष्ट होऊन वेदना थांबतील. 5 मिनिटं झाल्यानंतर कीड लागलेल्या ठिकाणी ब्रश करून दात स्वच्छ करावे.
दात दुखीची समस्या उद्भवू लागल्यानंतर मोहरीच्या तेलाचा वापर करावा. कारण यामध्ये असलेले गुणधर्म दातांवरील कीड नष्ट करून दात स्वच्छ करतात. याशिवाय मोहरीच्या तेलात हळद मिक्स करून तुम्ही दातांवर लावू शकता. हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म दातांमधील खराब जंतू बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. हे तेल दातांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
लसूणचा वापर केल्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होते. प्रत्येक स्वयंपाक घरात लसूण हा पदार्थ असतोच. त्यामुळे दातांमधील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही लसूणचा वापर करू शकता. लसूण वापरल्यामुळे दात स्वच्छ होतात. शिवाय यामुळे दातदुखी कमी होते. कीड लागलेल्या किंवा खराब झालेल्या दातांवर लसूण पेस्ट लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने दात स्वच्छ करा.