
केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
Beauty Tips: वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे शरीरासोबतच केसांच्या गुणवत्तेवर सुद्धा परिणाम दिसू लागतो. केस अतिशय निस्तेज आणि कोरडे झाल्यानंतर खूप जास्त गळतात. केसांमध्ये कोंडा, केस गळणे, केस पातळ होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने केस गळून टक्कल पडल्यानंतर केसांच्या महागड्या ट्रीटमेंट, महागडे हेअर केअर प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा केसांच्या वाढीवर परिणाम दिसून येत नाही. केसांच्या वाढीसाठी केसांना केवळ वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
नवीन केस उगवण्यासाठी प्रोटीन, झिंक, बायोटीन, विटामिन -सी, विटामिन -ई आणि ओमेगा-३ इत्यादी आवश्यक घटकांची गरज असते. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. महागड्या सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. हे पदार्थ केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. महिनाभरात नियमित केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे केस मजबूत आणि घनदाट होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आवळे खाणे केसांसाठी वरदान मानले जाते. आवळा, सुक खोबर, खजूर आणि भाजलेले काळे तीळ मिक्सरमधून एकत्र वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाचे लाडू बनवा. हे लाडू नियमित खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि केस सुंदर होतील. आवळ्यामध्ये असलेले आवश्यक घटक आणि विटामिन सी केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करते. यामुळे केस मजबूत आणि घनदाट होतात.
रोजच्या आहारात उकडलेले स्प्राऊट्स चाट बनवून खावे. चाट बनवताना उकडलेले स्प्राऊट्स, कांदा, टोमॅटो, इतर मसाले आणि लिंबाचा रस घालून चाट बनवावे. हे चाट सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा खाल्ले जाते. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन आणि ॲमिनो ॲसिड मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ होऊन केस मजबूत होतात.
बारीक चिरलेला पालक, किसलेले पनीर, बेसन आणि मसाल्यांचे मिश्रण करून तयार केलेली टिक्की चवीला अतिशय सुंदर लागते. ही टिक्की लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता. पालक खाल्ल्यामुळे केवळ केसांची वाढ होत नाहीतर शरीरातील लोहाचे प्रमाण सुद्धा वाढते. पनीर आणि पालकमध्ये आयर्न, फोलेट इत्यादी प्रोटीन युक्त घटक असतात.
Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार
भोपळ्याच्या बिया केसांसाठी गुणकारी आहेत. त्यामुळे टक्कल किंवा केसांच्या इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी भाजलेल्या भोपळ्याच्या बिया, बदाम, आक्रोड, सुके खोबरे आणि खजूर इत्यादी मिश्रणापासून बनवलेले लाडू खावेत. हे लाडू खाल्ल्यास केसांची वाढ होण्यासोबतच केस मजबूत आणि घनदाट होतील. यासाठी आवळा दह्यात मिक्स करून खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहण्यासोबतच टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल.
Ans: ताण, झोपेचा अभाव, पोषक घटकांची कमतरता, हार्मोन्समधील बदल, आजारपणानंतरची केसगळती, टाळूच्या समस्या आणि काही औषधांमुळे केस गळू शकतात.
Ans: डाळी, कडधान्ये, अंडी, दूध-दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, बिया, फळे आणि प्रथिन व लोहयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते.
Ans: केसांमध्ये केराटिन नावाचे प्रथिन असते. त्यामुळे आहारातून पुरेशी प्रथिने मिळणे केसांच्या सामान्य वाढीसाठी महत्त्वाचे आहे.