Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Tips: पावसाळ्याच्या ऋतूत गर्भधारणेचे नियोजन करताय? मग, फॉलिक अ‍ॅसिड घ्यायला विसरु नका

पावसाळ्यात तुम्ही जर गर्भधारणेचा विचार करत असाल आणि बाळासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्की काय करायला हवंय याबाबत तज्ज्ञांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 17, 2026 | 05:16 PM
पावसाळ्यात गर्भधारणेचा विचार करत असाल तर काय खावे (फोटो सौजन्य - iStock)

पावसाळ्यात गर्भधारणेचा विचार करत असाल तर काय खावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात तुम्ही जर गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर काय खावे 
  • हेल्दी राहणे अत्यंत आवश्यक 
  • डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला 
निरोगी गर्भधारणेची सुरुवात प्रत्यक्ष गर्भधारणा होण्यापूर्वीच होते. अनेकदा गर्भधारणेचा विचार करताना प्रेग्नन्सी टेस्ट पॅाझिटिव्ह आल्यानंतर आरोग्यासंबंधी काळजीवर भर दिला जातो. मात्र तुम्ही जर पावसाळ्यात किंवा त्यानंतर गर्भधारणा करण्याचा विचार करत असाल तर जून महिन्यापासूनच तुमच्या शरीरास तयार करा.

गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी किमान तीन महिने फॉलिक अ‍ॅसिडचे सेवन सुरू करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. फॉलिक अ‍ॅसिड हे व्हिटॅमिन बी-९ चे एक रूप असून बाळाचा मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. ⁠डॉ. पायल नारंग, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी अधिक महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Pregnancy: दिवसातून कधीही नाही तर ‘या’ वेळेत शारीरिक संबंध ठेवल्यास होईल गर्भधारणा, डॉक्टरांनी दिली योग्य वेळ

फॉलिक अ‍ॅसिड किती महत्त्वाचे 

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत, अनेकदा महिलेला गर्भधारणा झाल्याची जाणीव होण्यापूर्वीच गर्भातील न्यूरल ट्यूबची निर्मिती सुरू झालेली असते. या काळात शरीरात फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता असल्यास स्पायना बिफिडा आणि अ‍ॅनेन्सेफलीसारख्या न्यूरल ट्यूब दोषांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गर्भधारणेचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी सुमारे तीन महिने फॉलिक अ‍ॅसिडचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

फॉलिक अ‍ॅसिडची पुरेशी साठवण शरीरात तयार होण्यासाठी काही काळ आवश्यक असतो. त्यामुळे गर्भधारणा निश्चित झाल्यानंतरच फॉलिक अ‍ॅसिड सुरू केल्यास बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या सुरुवातीच्या विकासासाठी महत्त्वाचा कालावधी निघून गेलेला असू शकतो.

बाळाच्या निरोगी वाढीस मदत करण्याबरोबरच फॉलिक अ‍ॅसिड शरीरात निरोगी लाल रक्तपेशी तयार होण्यास सहाय्य करते आणि गर्भधारणेदरम्यान उद्भवणाऱ्या काही गुंतागुंतींचा धोका कमी करण्यासही मदत करू शकते.

महिन्यातून 5 दिवसात सहज होऊ शकता Pregnant, 24 तासात संपुष्टात येते 20% क्षमता; तज्ज्ञांचा खुलासा

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

आई आणि वडील दोघांनीही आपल्या आहारात पालक, ब्रोकोली, मसूर, कडधान्ये, लिंबूवर्गीय फळे आणि फोर्टिफाइड धान्ये यांसारख्या फोलेटयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मात्र, केवळ आहारातून आवश्यक प्रमाणात फोलेट मिळेलच असे नाही. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या घेण्याची शिफारस केली जाते. मधुमेह, लठ्ठपणा, अपस्मार (एपिलेप्सी) किंवा जन्मजात दोषांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन फॉलिक अ‍ॅसिडची योग्य मात्रा आणि इतर आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.

फॉलिक अ‍ॅसिडच्या सेवनासोबतच संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, वजन नियंत्रित राखणे, तंबाखू व मद्यपानाचे सेवन टाळणे आणि आधीपासून असलेल्या आजारांचे योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच गरजेचे आहे. गर्भधारणेपूर्व आरोग्य तपासणीमुळे पोषणातील कमतरता, प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या आणि गर्भधारणेवर परिणाम करू शकणारे इतर घटक वेळीच ओळखता येतात.

गर्भधारणेपूर्वी केलेली तयारी ही आई आणि बाळ दोघांनाही निरोगी व सुरक्षित गर्भधारणेचा आनंद देते. पालकत्वाची योजना आखत असाल, तर आजपासूनच फॉलिक अ‍ॅसिड सेवन करा आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करा.

Web Title: Monsoon tips planning for a baby during the monsoon season do not forget to take folic acid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Monsoon Tips
  • pregnancy
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

Pregnancy Tips: डिलीव्हरीचे दिवस जवळ आले अन् झोप झाली कमी; गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ‘या’ कारणांमुळे वाढतो त्रास
1

Pregnancy Tips: डिलीव्हरीचे दिवस जवळ आले अन् झोप झाली कमी; गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ‘या’ कारणांमुळे वाढतो त्रास

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा
2

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं
3

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.