गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती (फोटो सौजन्य - iStock)
जोडपी अनेकदा दिवसभरात कधीही गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर प्रयत्न यशस्वी होत नाहीत तेव्हा निराश होतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आशिक अली यांनी या विषयावर मौल्यवान माहिती दिली आहे. त्यांनी अलीकडेच गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांनी कधी प्रयत्न करावे हे स्पष्टपणे व्हिडिओतून सांगितले आहे. डॉक्टरांनी नक्की कोणता सल्ला दिला आहे जाणून घेऊया.
या काळात फर्टिलिटी उत्तम
इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये, डॉ. आशिक अली स्पष्ट करतात की संशोधनातून असे दिसून आले आहे की पुरुषांची प्रजनन क्षमता अर्थात Fertility Quality ही सकाळी ६:३० ते ७:३० दरम्यान उत्तम दर्जाची असते, ज्यामुळे हा काळ शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि बाळ कन्सिव्ह करण्यासाठी आदर्श काळ बनतो.
याशिवाय या काळात वीर्य गुणवत्ता सुधारते. डॉक्टरांनी पुढे स्पष्ट केले की, संशोधनातून असे दिसून येते की या काळात पुरुषांची वीर्य गुणवत्ता दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेपेक्षा निरोगी, अधिक सक्रिय आणि अधिक शक्तिशाली मानली जाते. म्हणून, जोडप्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे आणि बाळाचा विचार करत असाल तर या काळात लैंगिक संबंध जपावेत.
या ‘गोल्डन अवर्स’चा फायदा घ्या
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चांगली झोप आणि शरीराची नैसर्गिक हार्मोनल लय सकाळच्या प्रजननक्षमतेला बळकटी देते असे शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणून, जर एखादे जोडपे गर्भधारणेचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी या ‘गोल्डन अवर्स’चा नक्कीच फायदा घ्यावा. त्यांना या वेळेत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने नक्कीच गर्भधारणा होण्यास मदत मिळते.
गर्भवती होण्यासाठी ‘या’ दिवशी लैंगिक संबंध ठेवा
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, डॉक्टरांनी गर्भधारणेचे नियोजन करण्यासाठी जवळीक साधण्यासाठी योग्य वेळ आणि दिवसाची माहितीदेखील दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मासिक पाळी संपल्यानंतर १२ वा ते १८ वा दिवस हा सर्वात योग्य असतो. या दिवसांना प्रजननक्षम दिवस म्हणतात, जेव्हा ओव्हुलेशन होते. जर तुमची मासिक पाळी नियमित असेल, तर या दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून, जोडपे या दिवसांत आणि शिफारस केलेल्यावेळी गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करू शकतात.
फक्त वेळेवरच नव्हे तर या गोष्टींकडे लक्ष द्या
तथापि, तज्ज्ञ असा निष्कर्ष काढतात की गर्भधारणेसाठी केवळ योग्य वेळ महत्त्वाची नाही तर चांगली जीवनशैली, योग्य ओव्हुलेशन ट्रॅकिंग आणि योग्य माहिती यासारखे इतर घटक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपली लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे, व्यायामाकडे, योग्य पद्धतीने राहण्याकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे.
पहा सविस्तर व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






