बाळ न होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात (फोटो सौजन्य- iStock)
काय सांगतात डॉक्टर
आहाराकडे दुर्लक्ष
डॉ. नर्मदा यांच्या मते, पहिली वाईट सवय म्हणजे जेवण वगळणे आणि संतुलित आहाराकडे दुर्लक्ष करणे. ही चांगली पद्धत नाही. सध्या अनेक जण कामाच्या ताणामुळे असेल अथवा कंटाळा केल्यामुळे जेवणाकडे आणि योग्य आहाराकडे लक्ष देत नाहीत. यामुळे केवळ आजारच निर्माण होत नाहीत तर बाळ न होण्याचेदेखील अथवा गरोदर न राहण्याचे हे मुख्य कारण ठरते. यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित हेल्दी आहार घेणे आणि वेळेवर जेवणे.
सततचा ताण
दुसरी सवय म्हणजे जास्त ताण. सतत फोन कॉल, मल्टीटास्किंग आणि मानसिक ताण शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडवतात. अनेक महिला उच्च स्तरावर काम करतात अथवा अगदी सामान्य ठिकाणी काम करत असणाऱ्या महिलांनाही कामाचा ताण, काम करत असणाऱ्या ठिकाणाच्या राजकारणामुळे येणारा मानसिक ताण या सर्व गोष्टींचा परिणाम हा शरीरावर होताना दिसून येतो आणि त्यामुळे बाळ होत नाही.
व्यायाम न करणे आणि उशीरापर्यंत जागं राहणं
तज्ज्ञ पुढे स्पष्ट करतात की व्यायामाचा अभाव हे एक कारणीभूत घटक आहे. आजकाल लोक इतके व्यस्त आहेत की त्यांना शारीरिक हालचालींसाठी वेळ मिळत नाही, जे चुकीचे आहे. हे शरीराचे नुकसान करते. डॉक्टर पुढे म्हणतात की जोडप्यांना उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय शरीराच्या नैसर्गिक हार्मोनल चक्रात व्यत्यय आणते, ज्यामुळे प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम होतो. यामुळे गर्भधारणेदरम्यान समस्या उद्भवू शकतात.
पुरेशी झोप न मिळणे
डॉक्टर असा निष्कर्ष काढतात की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप न घेणे. त्या स्पष्ट करकतात की, दररोज ७ ते ८ तासांची झोप केवळ एकूण आरोग्यासाठीच नाही तर प्रजननक्षमतेसाठी देखील आवश्यक आहे. जर तुम्ही गर्भधारणेचे नियोजन करत असाल तर या पाच गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्हाला अजूनही गर्भधारणा होण्यास त्रास होत असेल तर विलंब न करता तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपाय करून घ्या
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






