Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदी या भाजीची पावडर खाऊन राहतात फिट, लोखंडासारखे शरीर आणि सांधेदुखी होते दूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींना या भाजीचा पराठा फार आवडतो. यात अनेक पोषक घटक आढळले जातात. यातील पोषक घटक सांधे व हाडे मजबूत करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यास याची फार मदत होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 19, 2024 | 06:39 AM
नरेंद्र मोदी या भाजीची पावडर खाऊन राहतात फिट, लोखंडासारखे शरीर आणि सांधेदुखी होते दूर

नरेंद्र मोदी या भाजीची पावडर खाऊन राहतात फिट, लोखंडासारखे शरीर आणि सांधेदुखी होते दूर

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या काळानुसार, लोकांच्या जीवनशैलीतही अनेक बदल घडून आले आहेत. हे बदल खाण्या-पिण्यातूनही दिसून आले. आजकाल अनेकजण घरगुती पदार्थांऐवजी बाहेरचे तेलकट आणि अनहेल्दी पदार्थांचे अधिक सेवन करतात. परिणामी फार कमी वयात लोकांना आरोग्याच्या वेगवगेळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. लट्ठपणाने तर बरेचजण ग्रासलेले आहेत. अशात वेट लॉससाठी प्रत्येकजण धडपडत असत. लोक वजन कमी करण्यासाठी आणि एका हेल्दी लाइफस्टाइलसाठी नवनवीन उपाय शोधून काढत असतात.

आज आम्ही तुम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडीच्या एका पदार्थाविषयी माहिती सांगत आहोत. हा पदार्थ आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतो. आम्ही ज्या पदार्थाविषयी बोलत आहोत त्याचे नाव आहे शेवग्याच्या शेंगाची पावडर. मोदींना या पावडरपासून तयार केलेला पराठा खायला फार आवडते.वजन कमी करण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग आहे. या पावडरचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश कसा करावे ते जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – 99% लोकांना Chia seeds’चे हिंदी नाव माहिती नाही! तुम्हाला माहिती आहे का?

पोषक घटकांनी समृद्ध

शेवग्याच्या शेंगांची पावडर अर्थात याला मोरिंगा पावडर असेही संबोधले जाते. ही अनेक पोषणमूल्यांनी समृद्ध एक सुपरफूड आहे. आयरन, कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फोरस, मॅग्नेशियम आणि विटामिन ए, बी, सी, आणि के यांसारखे आवश्यक घटक मोठ्या प्रमाणात आढळले जातात. यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. पोटाची चरबी कमी करण्यास याची मदत होते. आपल्या दैनंदिन आहारात याचे सेवन फार फायद्याचे ठरू शकते.

अशा प्रकारे करा आहारात समावेश

मोरिंगाची चटणी

शेवग्याच्या पानांपासून चविष्ट अशी चटणी बनवली जाऊ शकते. यासाठी सर्व प्रथम शेवग्याची पाने थोडीशी सुकवून घ्या. मग ही पाने तेलात टाका ढवळत यांना कुरकुरीत शिजवून घ्या.आता एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, थोडे हरभरे आणि उडीद डाळ, खोबरे आणि थोडी चिंच टाकून शिजवून घ्या. मग यात मीठ टाका. आता हे तयार मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा आणि तयार चटणी खाण्यासाठी सर्व्ह करा.

हेदेखील वाचा – चेहऱ्यासह केसांचीही काळजी घेतो हा नैसर्गिक पदार्थ, अशाप्रकारे बनवा Instant Mask

मोरिंगचा पराठा

तुम्ही सकाळच्या नाश्त्याला मोरिंगचा पौष्टिक पराठा बनवू शकता. यासाठी मोरिंगाच्या शेंगा उकडून हाताने मॅश करा. यात तुमच्या आवडीचे मसाले टाका आणि स्टफिंग तयार करा. यानंतर गव्हाचे पीठ मळून एक गोळा घ्या आणि यात तयार स्टफिंग भरून याचा पराठा लाटून घ्या. तयार पराठा तव्यावर खरपुस भाजा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.

मोरिंगाच्या पानांचा ज्यूस

मोरिंगा पानांचा रस, जो औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, तो देखील तयार करून पिला जाऊ शकतो. चवीसाठी तुम्ही यात थोडेसे रॉक सॉल्ट घालू शकता. हे पचनक्रिया सुधारते आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे तुमची त्वचा आणि केसांची वाढही सुधारेल.

मोरिंगा पराठा

यासाठी एका मोठ्या वाडग्यात गव्हाचे पीठ, बेसन पीठ, दही, हळद, लाल तिखट चटणी, तीळ, ओवा, मीठ व हिंग मिक्स करून घ्या. यानंतर यात लसूण, जिरे, मिरची, आल्याची पेस्ट व कोवळी शेवग्याची पाने स्वछ करून टाका आणि व्यवस्थित पीठ मळून घ्या. तयार पिठाचे पराठे लाटा आणि पॅनवर खरपूस भाजून घ्या.

Web Title: Moringa or shevga bhaji paratha pm modi favorite this protein rich recipe make bones joints strong and build muscle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
1

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा
2

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर
3

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम
4

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.