Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोंड्यापासून मुरुमांपर्यंत अनेक समस्यांवर मुलतानी माती आहे रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसह केसांच्या आरोग्याची सुद्धा पूर्णपणे वाट लागून जाते. केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाहीतर केस खराब होऊन जातात. तसेच वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा तेलकट होते. य सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या वापरता मुलतानी मातीचा वापर करा. मुलतानी मातीमध्ये असलेले गुणधर्म केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2024 | 10:07 AM
मुलतानी मातीचे फायदे

मुलतानी मातीचे फायदे

Follow Us
Follow Us:

मागील अनेक शतकांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केला जात आहे. मुलतानी मातीमध्ये असलेले गुणधर्म केस आणि त्वचेला पोषण देतात. त्यामुळे अजूनही बऱ्याच घरांमध्ये त्वचा आणि केसांसंबधित समस्या जाणवू लागल्यानंतर मुलतानी मातीचा वापर केला जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांसंबधीत अनेक समस्या उद्भवतात. पावसात भिजून आल्यानंतर किंवा मेकअप केल्यानंतर त्वचा लगेच चिकट आणि तेलकट होऊन जाते. वातावरणातील आद्रतेचा परिणाम लगेच केसांवर आणि त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करा. आज आम्ही तुम्हाला मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे त्वचा आणि केसांना नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

मुलतानी मातीचे फायदे:

मुलतानी मातीमध्ये असलेले अल्युमिनियम सिलिकेट केसांच्या वाढीसाठी प्रभावी आहे. तसेच यामध्ये चुन्याचे घटक आढळून येतात. चुन्याचे घटक केसांमधील कोंडा, बॅक्टेरिया, अतिरिक्त तेल आणि धूळ काढून टाकण्यासाठी मदत करते.केसांच्या वाढीसाठी तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता. मातीमध्ये असलेले चुन्याचे घटक केसांमधील कोंडा, बॅक्टेरिया, अतिरिक्त तेल आणि धूळ काढून टाकण्यासाठी मदत करते.

हे देखील वाचा: पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे चेहरा सतत चिकट होतो? मग वापरून पहा ‘हे’ फेसमास्क

मुलतानी मातीचे फायदे

मुलतानी मातीचे त्वचेला होणारे फायदे:

  • मुलतानी मातीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेमधील अतिरिक तेल काढून टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे तुमची खराब झालेली त्वचा गुळगुळीत आणि चमकदार होण्यास मदत होते.
  • मातीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात , जे त्वचेला टोनिंग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मुलतानी माती त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे.
  • मुलतानी मातीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुमानी भरलेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी मदत करते. मुरुमांमधील बॅक्टेरिया नष्ट होऊन त्वचा सुंदर होते.
  • उन्हाळामुळे टॅन आणि तेलकट झालेली त्वचा सुधारण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मुलतानी माती त्वचेला लावल्यामुळे अनेक समस्या दूर होतात.
  • मुलतानी माती त्वचा खोलपर्यंत स्वच्छ करून त्वचेचा रंग सुधारण्यासाठी मदत करते.
हे देखील वाचा: निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चष्मा घालावा की नाही? जाणून घ्या सविस्तर

मुलतानी मातीचे फायदे

मुलतानी मातीचे केसांना होणार फायदे:

  • पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आणि केस स्वच्छ न केल्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते. कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करा. यामुळे तुमचे केस मऊ आणि स्वच्छ होतील.
  • मुलतानी मातीमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे केसांमधील कोंडा आणि टाळूवरील इन्फेक्शन कमी होते. तसेच यामुळे केस हायड्रेट आणि चमकदार राहतात.
  • केसांच्या मजबूत वाढीसाठी मुलतानी मातीचा वापर करा.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Multani mitti benefits for skin and hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 10:07 AM

Topics:  

  • hair care tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.