मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क
क्षणभर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्यभरात सगळीकडे हजेरी लावली आहे.वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. रोगराई वाढल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हवेमध्ये गारवा आणि आर्द्रता असते. या आद्रतेचा सगळ्यात जास्त परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घरी असल्यावर चेहरा पूर्णपणे तेलकट होऊन जातो. त्वचेवर चिकटपणा आणि तेलकटपणा वाढतो. चेहऱ्यावर तेल दिसू लागल्यानंतर तात्काळ चेहरा स्वच्छ केला नाही तर मुरूम किंवा किंवा पुरळ येतात.
चेहऱ्यावर साचलेल्या तेलामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स काही दिवसांनंतर निघून जातात, मात्र त्यांचे डाग तसेच राहतात. तेलकट चेहऱ्यावर मेकअप करणे पावसाळ्यात कठीण होऊन जाते. मेकअप केल्यानंतर घाम आला की सगळं मेकअप निघून जातो. त्यामुळे मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर फेसमास्क लावा. फेस मास्कमुळे त्वचा हायड्रेट राहून चेहऱ्यावर तेल कमी होते. त्यामुळे मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर कोणते फेसमास्क लावावे, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: गरोदरपणात महिलांनी खावे रोज काळे ड्रायफ्रूट, 5 फायद्यांसह भासणार नाही Iron ची कमतरता
मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क
बाजारात मिळणाऱ्या फळांपासून तुम्ही घरच्या घरी फेसमास्क बनवू शकता. फळांमध्ये असलेले गुणधर्म त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्ही केळी, सफरचंद, पपई आणि संत्री हे चार फळे एकत्र करून फेसमास्क बनवू शकता. यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळेल आणि त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील. फळांच्या फेसमास्कमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन चेहऱ्याचा रंग सुधारेल.
मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी काकडी प्रभावी आहे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी काकडीचा वापर करावा. फेसमास्क बनवण्यासाठी काकडीचा रस काढून त्यात मिल्क पावडर आणि अंड्याचा पांढरा बल्क मिक्स करा. तयार केलेला मास्क चेहऱ्याला लावून फेसमास्क कोरडा झाल्यावर पाण्याने स्वच्छ करा.
हे देखील वाचा: सकाळच्या ‘या’ 5 सामान्य चुका वाढवतात आपल्या शरीरातील चरबी, प्रत्येकाने जाणून घेणे महत्वाचे
मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर हे फेसमास्क
मुलतानी मातीचा वापर मागील अनेक वर्षांपासून त्वचेसाठी केला जात आहे. फेसमास्क बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी टाका.जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या त्वचेवरील तेल कमी होऊन चेहऱ्यावर ओलावा टिकून राहील. फेसमास्क कोरडा झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ करा.