
Mumbai Trip : मुंबई दर्शन करायचंय? मग मायानगरीतील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन
राणी बाग
हे मुंबईतील एक सुंदर आणि सर्वात जुने प्राणीसंग्रहालय आहे. सुमारे ६० एकर परिसरात पसरलेल्या या सार्वजनिक उद्यानात तुम्हाला अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि वनस्पती पाहायला मिळतील. इथे तुम्ही प्राणी-पक्ष्यांना जवळून पाहू शकता, हिरवळीने भरलेल्या परिसरात फेरफटका मारु शकता आणि सुंदर फोटोज क्लिक करु शकता. प्राणीप्रेमींसाठी हे ठिकाण एका चांगला पर्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री ‘वीरमाता जिजाबाई’ यांच्या नावावर प्राणीसंग्रहालयाचे नाव ठेवण्यात आले आहे.
पॅराडॉक्स म्यूजियम
सीएसटीएम स्टेशन आणि चर्चगेट रेल्वे स्टेशनपासून ५ मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे मॅजिलकल म्यूजियम कोणत्या जादुहून कमी नाही. इथे तुम्हाला अनेक अशा स्वप्नवत गोष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळतील. मित्रांसोबत फिरण्याचा प्लॅन करत असल्यात हे म्यूजियम तुमच्यासाठी परफेक्ट आहे. इथे तुम्ही विविध खेळ खेळू शकता तसेच फोटोज आणि व्हिडिओज देखील शूट करु शकता. इथे जाण्यासाठी एंट्री फी भरावी लागेल.
स्नो वर्ल्ड
स्नो स्लाईडिंग, आइस स्केटिंग, स्नोबोर्डिंग, स्नो फॉल, आणि स्नोबॉल फाईट्स अशा उपक्रमांमध्ये रस असल्यास तुम्ही स्नो वर्ल्डला भेट देऊ शकता. नवी मुंबईतील सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये आणि कुर्लातील फिनिक्स मार्केटसिटी माॅलमध्ये स्नो वर्ल्ड उपलब्ध आहे. इथे जाऊन तुम्ही कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या बर्फाचा आणि स्नो एक्टिव्हिटीजचा आनंद लुटु शकता. लहान मुलांना फिरायला घेऊन जाण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
गेटवे ऑफ इंडिया
मुंबईत आलात आणि गेटवेला भेट दिली नाही तर काय केलं? छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसवरुन टॅक्सी करुन तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. सूर्यास्ताच्या वेळी इथे फार सुंदर दृष्य दिसते. 1911 मध्ये King George V आणि Queen Mary यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्मारकाची बांधणी करण्यात आली होती. आजही हजारो पर्यटक मुंबईत या स्मारकाला पाहायला येतात. ब्रिटिश काळात समुद्रमार्गे भारतात येणाऱ्यांसाठी हे ठिकाण एका प्रेवशद्वाराचे काम करत होते. अनेक चित्रपटांची शूटिंग देखील या ठिकाणी पार पडली आहे.
नॅशनल म्यूजिमय ऑफ नॅशनल सिनेमा
जर तुम्ही चित्रपटप्रेमी असाल आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाविषयी तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर या ठिकाणाला तुम्ही एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी. दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात हे संग्रहालय वसले आहे. इथे तुम्हाला जुने कॅमेरे, वेशभूषा, चित्रपट साहित्य आणि दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळतील. तुम्ही मंगळवार ते रविवार या संग्रहालयाला भेट देऊ शकता, सोमवारी हे संग्रहालय बंद ठेवण्यात येते.