Navratri 2025 : नवरात्रीच्या उपवासानिमित्त घरी बनवा हटके अन् चवदार साबुदाण्याचे थालीपीठ; सोपी-झटपट तयार होणारी रेसिपी
नवरात्री हा भारतातील एक महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव आहे. या नऊ दिवसांत माता दुर्गेच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. भक्त उपवास करतात, फळाहार घेतात व सात्त्विक पदार्थ बनवतात. उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ हलके, पचायला सोपे आणि पौष्टिक असतात. साबुदाणा हा अशा उपवासातील पदार्थांमध्ये सर्वाधिक वापरला जातो. साबुदाण्यापासून खिचडी, वडा, खीर, थालीपीठ असे अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुमच्यासाठी साबुदाण्याची एक अनोखी आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत जी तुम्ही याआधी क्वचितच खाल्ली असेल.
आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे साबुदाणा थालीपीठ. हा एक झटपट, चविष्ट आणि पोटभर उपवासाचा खास पदार्थ आहे. कुरकुरीत आणि तुपात भाजलेले थालीपीठ उपवासात खाल्ल्यावर चवीला अप्रतिम लागते. बऱ्याचदा उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशात साबुदाण्याचा हा चवदार थालिपीठ तुमच्या तोंडाचे चोचले पुरवण्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरेल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
चायनीज खाण्याची इच्छा झाल्यास घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर चिली, नोट करून घ्या रेसिपी
कृती
थालीपीठासाठी साबुदाणा किती वेळ भिजवायचा?
साबुदाणा स्वच्छ धुवा आणि निथळून घ्या. साबुदाणा मऊ आणि घट्ट होईपर्यंत सुमारे ४-६ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवा.
नवरात्रीच्या उपवासात थालीपीठ खाऊ शकतो का?
सामान्यतः नवरात्री, एकादशी, महाशिवरात्री इत्यादी उपवासाच्या वेळी बनवले जाणारे थालीपीठ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.