सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत पनीर पराठा
नाश्त्यामध्ये पराठा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पनीरचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीर भाजी, पालक पनीर किंवा पनीर बुर्जी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ पनीरपासून बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर पराठा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही पराठा बनवू शकता. हा पदार्थ दही किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो. याशिवाय अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)






