Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ

Lifestyle News : नवरात्रीनिमित्त तुम्हीही उपवास करणार असाल तर या रेसिपीज तुम्हाला माहिती असायलाच हव्यात. चाटपासून ते उपवासाच्या चिलापर्यंत या रेसिपीज फक्त पोट भरणार नाहीत तर तुमच्या मनालाही खुश करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 07, 2026 | 08:15 PM
Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीच्या उपवासात नेहमीची साबुदाणा खिचडी आणि बटाट्याच्या पदार्थांऐवजी काही भन्नाट पर्याय ट्राय करता येतील.
  • गोड पदार्थांपासून चटपटीत स्नॅक्सपर्यंत घरच्या घरी झटपट बनणारे अनेक पदार्थ उपवासासाठी खास ठरू शकतात.
  • कमी वेळात तयार होणारे आणि चवीला हटके असे हे पदार्थ उपवासाच्या दिवसांमध्ये मेनूमध्ये नक्कीच बदल आणतील.
शारदीय नवरात्री ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरु होणार असून १९ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त देवीच्या नऊ रुपांची मनोभावनेने पूजा केली जाते. अनेक भाविक या नऊ दिवसांत उपवास/व्रत करतात ज्यामुळे याकाळात काही पदार्थ खाणे वर्ज्य असते. उपवासात काही ठराविक उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात ज्यामुळे जास्त दिवस उपवास असला की तेच तेच निवडक पदार्थ खाऊन कंटाळा येतो. उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची उसळ हे पदार्थ लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? नेहमीच्या या काॅमन उपवासाच्या पदार्थांव्यतिरिक्त अनेक टेस्टी आणि भन्नाट उपवासाचे पदार्थ तुम्ही घरी ट्राय करु शकता.

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!

ड्रायफ्रुट खीर

ड्रायफुट्सची ही खीर फक्त चवीला भारी लागत नाही तर फार कमी वेळेत ती तयार होते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. यासाठी १ लीटर दुधाला मंद आचेवर गॅसवर शिजवत ठेवा. दूधाला अधूनमधून ढवळत राहा आणि त्याला अर्धे होईपर्यंत शिजवा. दूध थोडे घट्ट झाले की यात चिरलेले काजू, बदाम, अक्रोड, खरबुजाच्या बिया, आणि किसलेलं खोबरं घालून दूधात छान ढवळून घ्या. गोडवा आणण्यासाठी यात साखर किंवा खजूराची पेस्ट टाका. सर्वात शेवटी तुम्हाला यात तूप आणि हिरव्या वेलचीची पावडर घालायची आहे. खीर छान घट्टसर शिजली की एका वाटीत तिला खाण्यासाठी सर्व्ह करा.

फळांपासून बनवा स्मूदी

उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही फळांपासून तयार केलेली स्मूदी ट्राय करु शकता. वेगवेगळ्या फळांपासून छान स्मूदी तयार केली जाऊ शकते जी दिवसभर तुम्हाला उर्जावान ठेवेल. यासाठी सफरचंद, केळी, चिकू, दही, मध किंवा तुमच्या आवडीचे फळ घालून मिक्सरमध्ये वाटा. एका ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे आणि तयार स्मूदी ओतून थंडगार ड्रिंकचा आनंद लुटा.

कुट्टूच्या पिठाचा चिला

उपवासात कुट्टूचे पीठ खाल्ले जाऊ शकते. या पिठापासून तुम्ही कुरकुरीत असा चिला तयार करु शकता. हा चिला पचायला हलका ठरतो. हा चिला तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात कुट्टूचे पिठ, त्यात मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून मिश्रण तयार करा. आता गरम तव्यावर तेल पसरवून तयार मिश्रणाचा चिला तयार करा आणि दोन्ही बाजूंनी याला कुरकुरीत भाजा. हा चिला तुम्ही दहीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

मखाना आणि शेंगदाणा भेळ

उपवासावेळी काही चटपटीत आणि हलकं खाण्याची इच्छा होत असेल तर मखाना आणि शेंगदाणा भेळ तुम्ही तयार करु शकता. यासाठी एका वाडग्यात भाजलेले शेंगदाणे घ्या. मखाण्यांना तूपात भाजा आणि त्यांना शेंगदाण्याच्या वाडग्यात घाला. आता यात काळीमिरी पूड आणि सैंधव मीठ घालून साहित्य एकत्र करा. तुमची उपवासाची भेळ तयार आहे.

रताळ्याची चाट

चाट लव्हर्ससाठी खास, तुम्ही उपवासात रताळ्याची खास चाट तयार करु शकता. यासाठी कुकरमध्ये रताळ्यांना दोन शिट्ट्या देऊन शिजवून घ्या. रताळ्याचे तुकडे करा आणि कढईत तूप घालून यात रताळ्याचे तुकडे छन रोस्ट करा. आता यात काळी मिरी पूड, जिरेपूड आणि सैंधव मीठ घालून चांगल मिक्स करा. तयार चाट खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: Navratri fasting special recipes dry fruit kheer smoothie kuttu chilla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Navratri 2026
  • upvas food

संबंधित बातम्या

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!
1

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?
2

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच
3

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
4

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.