Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!
नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवस हा एका विशिष्ट रंगाशी जोडलेला असतो, जो त्या दिवसासाठी शुभ मानला जातो. भक्त अनेकदा या रंगाचे कपडे परिधान करुन एक प्रकारे सण साजरा करतात. हे रंग शुभता आणि सकारात्मकत ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. चला तर मग नवरात्रीचे नऊ रंग (Nine Colors Of Navratri) आणि त्यांचे महत्त्व जाणून घेऊया.
Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
पहिला दिवस – केशरी रंग
नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीला समर्पित असतो. या दिवसासाठी केशरी हा रंग खास ठरणार आहे. हा रंग सर्जनशीलता, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी भक्त केशरी रंगाचे कपडे घालून देवीकडे मनाची शांती आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करतील.
दुसरा दिवस – पांढरा रंग
सणाचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. या दिवशी पांढऱ्या रंगला विशेष महत्त्व आहे. पांढरा रंग हा शांती, पवित्रता आणि साधेपणाचा प्रतीक मानला जातो. या दिवशी भक्त पांढऱ्या रंगाचे कपडे घालून देवीकडे मनाची शांती आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करतील.
तिसरा दिवस – लाल रंग
नवरात्रीचा तिसरा दिवस हा देवी चंद्रघंटा हिला समर्पित असून या दिवशी लाल रंग हा रंग खास ठरणार आहे. हा रंग अनेकांच्या आवडीचा आहे. लाल रंग हा प्रेम, उर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. भक्त या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करुन देवीकडे धैर्य आणि शक्तीचा आशीर्वाद मागू शकतात.
चाैथा दिवस – राॅयल ब्लू
नऊ रात्रींचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्री या सणातील चाैथा दिवस देवी कूष्मांडाला समर्पित करण्यात येणार आहे. या दिवशी राॅयल ब्लू हा रंग खास ठरणार आहे. हा रंग शक्ती आणि शांतीचे प्रतीक ठरतो. तिसऱ्या दिवशी या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीची आराधना करु शकता. लक्षात घ्या, प्रत्येक दिवसासाठी ठरवण्यात आलेला हा रंग त्या दिवसासाठी शुभ मानला जाणार आहे. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे साहस आणि जीवनात संतुलन मिळावे यासाठी प्रार्थना करु शकता.
पाचवा दिवस – पिवळा रंग
नवरात्रीतील पाचव्या दिवशी पिवळा हा रंग खास ठरणार आहे. हा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित असून भक्त या दिवशी तिच्या या रुपाची पूजा करतील. पिवळा रंग हा आनंद, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद मागू शकता.
सहावा दिवस – हिरवा रंग
सणाच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाणार असून हिरवा हा या दिवसासाठीचा प्रमुख रंग असणार आहे. लक्षात घ्या, हिरवा रंग हा वाढ, शांती आणि समृद्धीचे प्रतीक ठरतो. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे जीवनात स्थिरता आणि संतुलन मिळाने यासाठी प्रार्थना करु शकता.
सातवा दिवस – राखाडी रंग
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रि देवीची पूजा केली जाते. हे देवीच्या रुपांमधील सर्वात धैर्यशील रुप आहे. राक्षसांचा संहार करण्यासाठी देवीने कालरात्रीचे रुप धारण केले होते. राखाडी हा या दिवसासाठीचा प्रमुख रंग असणार आहे. हा रंग संतुलन आणि स्थिरतेचे प्रतीक ठरतो. गरबा नाईट्सला जाताना प्रत्येक दिवशी खास आणि शुभ ठरणाऱ्या या रंगाचे कपडे परिधान करा आणि सणाचा आनंद लुटा.
आठवा दिवस – जांभळा रंग
नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागाैरीची पूजा-अर्चा केली जाणार असून जांभळा रंग या दिवसासाठी खास ठरला आहे. हा रंग ज्ञान, अध्यात्म आणि आंतरिक शांतीचे प्रतीक ठरतो. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे ज्ञान, यश आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करु शकता. लक्षात घ्या, नवरात्रीतील प्रत्येक रंग हा देवीच्या विशिष्ट रूपाचे आणि तिच्या गुणांचे प्रतिनिधित्व करत असतो ज्यामुळे सणात या रंगाचे महत्त्व खूप जास्त आहे.
नववा दिवस – मोरपिसी रंग
सणातील शेवटचा नववा दिवस हा देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे. हा रंग उत्साह, सुसंवाद आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करु शकता. लक्षात घ्या, नवरात्रीतील प्रत्येक रंग हा देवीच्या विशिष्ट रूपाचे आणि तिच्या गुणांचे प्रतिनिधित्व करत असतो ज्यामुळे सणात या रंगाचे महत्त्व खूप जास्त आहे.






