Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगरीचा डोसा ते चाटपर्यंत… यंदाच्या नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांचा बदलला ट्रेंड; नवीन फ्यूजन डिशेस तुम्ही ट्राय केलेत की नाही?

Upvas Food : नवरात्रीत उपवास करण्याचा विचार आहे? मग तेच तेच बोरींग पदार्थ सोडा आणि यंदा नवरात्रीत ट्राय करा उपवासाचे फ्यूजन पदार्थ. यांची चव घरातील सर्वांनाच करेल खुश.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 08, 2026 | 08:15 PM
भगरीचा डोसा ते चाटपर्यंत... यंदाच्या नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांचा बदलला ट्रेंड; नवीन फ्यूजन डिशेस तुम्ही ट्राय केलेत की नाही?

भगरीचा डोसा ते चाटपर्यंत... यंदाच्या नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांचा बदलला ट्रेंड; नवीन फ्यूजन डिशेस तुम्ही ट्राय केलेत की नाही?

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीच्या उपवासात नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर यंदा काहीतरी हटके ट्राय करा.
  • उपवासाचे पारंपरिक पदार्थ नव्या पद्धतीने बनवून चवीत बदल करता येतो.
  • कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार होणारे हे पर्याय उपवासाच्या मेनूमध्ये नक्कीच रंगत आणतील.
नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे. नऊ रात्रींचा समूह असा याचा थेट अर्थ होतो. याकाळात देवी दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. हा सण रात्री साजरा केला जात असल्याने सणानिमित्त ग्रुपमध्ये गरबा खेळण्याची जुनी परंपरा आहे. यंदा रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ पासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. १९ नोव्हेंबर हा नवरात्रौत्सवाचा शेवटचा दिवस. याकाळात अनेकजण देवीची आराधना करुन नऊ दिवस उपवास देखील करतात. तुम्हीही नवरात्रीत उपवास करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. काळानुसार उपवासाच्या पदार्थांचे स्वरुप देखील बदलले आहे. आता तोंडाचे चोचले पुरवण्यासाठी उपवासाचे काही हटके फ्यूजन पदार्थ घरी तयार केले जातात. या नव्या ट्रेंडी उपवासाच्या पदार्थांची लिस्ट आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तुम्ही यंदाच्या नवरात्रीत हे पदार्थ बनवून खाऊ शकता.

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ

उपवासाचा डोसा

आपण आजवर तांदळाच्या पिठाचा डोसा तर अनेकदा खाल्ला आहे पण उपवासाचा डोसा या पदार्थाविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का? भगर आणि साबुदाण्यापासून हा उपवासाचा डोसा तयार केला जातो. साबुदाणा ५ तास पाण्यात भिजवून मग एका मिक्सरच्या भांड्यात याला घाला. यात भगर, दही, हिरवी मिरची, जिरे आणि थोडे पाणी घालून डोश्याचे पीठ तयार करा. पिठात मीठ घाला आणि गरम तव्यावर याचे कुरकुरीत डोसे तयार करा. हा उपवासाचा डोसा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

उपवासाची टिक्की

कुरकुरीत चवीची बटाटा टिक्की तर आपण खाल्ली आहे. उपवासात हिच टिक्की आपण थोड्या हटके स्टाईलमध्ये तयार करणार आहोत. यासाठी उकडलेल्या बटाट्यांमध्ये सैंधव मीठ, काळी मिरी आणि थोडे शिंगाड्याचे पीठ मिसळा आणि टिक्की तयार करा. आता तव्यावर तेल टाकून तयार टिक्की कुरकुरीत शॅलो फ्राया करा.

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

राजगिऱ्याची पुरी आणि उसळ

उपवासात भाजी-पुरी खाण्याची क्रेव्हिंग होत असल्यास तुम्ही राजगिऱ्याच्या पिठापासून कुरकुरीत पुरी तयार करु शकता. यासाठी एका बाउलमध्ये राजगिऱ्याचे पिठ, मीठ, चमचाभर किसलेले गुळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठ मळून घ्या. एका प्लॅस्टिकच्या पिशवीवर थोडे तेल लावून यावर तयार पिठाच्या पुऱ्या थापा आणि गरम तेलात पुऱ्या कुरकुरीत तळा. भाजीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरचीची पेस्ट, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून खमंग चवीची उसळ तयार करा. ही बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याची कुरकुरीत पुरी यांचे काॅम्बीनेशन कमाल लागते.

 

Web Title: Navratri fasting trendy fusion recipes in marathi nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Navratri 2026
  • upvas food

संबंधित बातम्या

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका
1

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.