ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी
Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
रेल्वे सुटण्याच्या अर्धा तास आधी बदला स्टेशन
रेल्वे नियमांनुसार, जर तुमच्या रेल्वेचा पहिला चार्ट तयार झाला आहे. तरीही चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही ट्रेन सुरु होण्यापूर्वी साधारण ३० मिनिटांआधी आपले बोर्डिंग पॉइंट बदलू शकता. हे फार सोपे काम असून यासाठी तुम्हाला IRCTC च्या मोबाईल ॲपला सर्वप्रथम भेट द्यावी लागेल. याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमचे बोर्डिंग स्टेशन चेंज करु शकता. हा उपाय शेवटच्या क्षणातील धावपळ टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो.
फक्त एकदाच मिळतो पर्याय
लक्षात घ्या, रेल्वेचे बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी तुम्हाला वारंवार नाही तर फक्त एकदाच प्राप्त होते. जर तुम्ही घाईगडबीत रेल्वेने एकदा बोर्डिंग स्टेशन बदलले तर यात पुन्हा तुम्हाला बदल करता येणार नाही. यामुळेच आपले नवीन बोर्डिंग स्टेशन निवडताना काळजीपूर्वक निवडा.
जुन्या रेल्वे स्थानकावरुन चढल्यास आकारला जाईल दंड
रेल्वेच्या या नियमानुसार, तुम्ही आपले बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर जर जुन्या रेल्वे स्थानकावरुन रेल्वे पकडली तर अशा परिस्थितीत तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. एकदा का बोर्डिंग स्टेशन बदलले की, मग जुन्या रेल्वे स्थानकावरुन तुम्ही रेल्वे पकडू शकत नाही. बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर जुन्या रेल्वे स्थानकावरुन ट्रेन पकडणे म्हणजे रेल्वे नियमांचे उल्लंघन करणे आहे. टीटीईने जर तुम्हाला असे करताना पकडले तर विना तिकिट प्रवास करत असल्याचे मानून तुमच्यावर संबंधित कारवाई केली जाईल.
Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
काउंटर तिकिटासाठी वेगळी आहे पद्धत
जर तुम्ही तुमचे रेल्वे तिकिट ऑनलाईन बुक न करता, ऑफलाईन बुक केले असेल तर रेल्वे स्थानकावर जाऊन कागदी फाॅर्म भरुन तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येईल. तुमच्या फाॅर्मच्या आधारे, रिझर्वेशन अधिकारी आपल्या प्रणालीत तुमचे नवीन रेल्वे स्टेशन अपडेट करेल.






