navtapa (फोटो सौजन्य- social media)
नवतपाची सुरवात २५ मे पासून सुरु होणार असून ३ जूनला संपणार आहे. या ९ दिवसात तीव्र उष्णता राहणार आहे. या ९ दिवशी सूर्याचा प्रकोप असणार आहे. अश्या परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. या नऊ दिवसात तुम्ही घरीच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शीत पेय पिलं पाहिजे. काम असल्यास घरा बाहेर पडणे योग्य असेल. चला जाणून घेऊया या नवतपा पासून वाचण्यासाठी काय केले पाहिजे.
उन्हाळ्यात काकडीचा डिटॉक्स वॉटर खूप फायदेशीर, दररोज प्यायल्याने दूर होतील ५ समस्या
शक्य तितके पाणी प्या
उन्हाळ्यात, आरोग्य तज्ञ बहुतेकदा शक्य तितके पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही नवतपा दरम्यान ही सूचना पाळली नाही तर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी, नियमित अंतराने पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही या दिवसांत प्रवास करणार असाल तर तुम्ही तुमच्यासोबत पाण्याची बाटली अवश्य ठेवावी.
आहारात पाण्याचे प्रमाण जास्त पाहिजे
तुम्ही तुमच्या आहारात हंगामी फळांचा समावेश नक्कीच करावा. नवतपा दरम्यान, तुम्ही तुमच्या आहारात अशा गोष्टींचा जास्तीत जास्त समावेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असेल. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस आणि काकडी यांचे सेवन करणे चांगले असणार.
आहारात हायड्रेटिंग ड्रिंक्सचा समावेश
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नारळ पाणी पिऊ शकता. याशिवाय, सत्तू शरबत पिऊन तुम्ही तुमचे शरीर आतून थंड करू शकता. तुमच्या आहारात लस्सी, लिंबूपाणी, ताक आणि बेलचा रस यांसारखे हायड्रेटिंग पेये समाविष्ट करून, तुम्ही कडक उन्हातही आजारी पडण्याचा धोका कमी करू शकता.
6 गोष्टी मिसळून घरी बनवा ‘हा’ तेल, केस गळणे आणि कोंड्याची समस्या मुळापासून दूर होईल