नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य
अलीकडे नेपाळमध्ये झालेल्या बंडानंतर हा देश पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. नेपाळचा संस्कृती, खाद्यसंस्कृती, परंपरा, पोशाख किंवा पर्यटन स्थळं… सगळंच आज चर्चेत आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला नेपाळ हा असा देश आहे जिथे प्रत्येक वळणावर काहीतरी खास पाहायला मिळतं. पर्वतरांगा, मंदिरे, शांत झरे आणि दऱ्यांनी सजलेला हा देश प्रवाशांना नेहमीच आकर्षित करतो.
100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
अशाच एका सुंदर ठिकाणाचा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक उल्लेख होतो आहे, ऐना पहारा धबधबा(Aina Pahara Waterfall). हा अप्रतिम धबधबा नेपाळच्या तनहुं जिल्ह्यात आहे आणि तो काठमांडूपासून सुमारे 115 ते 120 किलोमीटर अंतरावर आहे. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील दगडांचा आकार अगदी हत्तीच्या चेहऱ्यासारख्या दिसतात! दूरून पाहताना असे वाटते जणू एखादा हत्ती शांतपणे टेकडीवर बसून पर्यटकांकडे पाहत आहे.
हत्तीसारखा दगडांचा नजारा
धबधब्याभोवती पसरलेली हिरवाई, पर्वतरांगांची थंड हवा आणि दगडांवरून कोसळणारे पाणी — हे दृश्य जणू निसर्गाने कोरलेले एखादं जादुई चित्र भासते. पाण्याचा वेगवान प्रवाह जेव्हा या दगडांवर आदळतो, तेव्हा समोरून पाहणाऱ्याला स्पष्टपणे हत्तीचा चेहरा दिसतो. निसर्गाची ही अद्भुत निर्मिती पाहून प्रत्येकजण थक्क होतो.
शांत आणि ऑफबीट ठिकाण
जर तुम्हाला गर्दीपासून दूर शांत ठिकाणी वेळ घालवायचा असेल, तर ऐना पहारा धबधबा हा उत्तम पर्याय आहे. इथलं वातावरण, थंड वारा आणि पाण्याचा सतत ऐकू येणारा कलकल आवाज मनाला शांत करतो. हे ठिकाण फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगसाठी सुद्धा परिपूर्ण आहे. प्रत्येक अँगलवरून दिसणारा नजारा अगदी पोस्टकार्डसारखा वाटतो.
साहस आणि ट्रेकिंगचा अनुभव
धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक छोटासा पण रोमहर्षक ट्रेक करावा लागतो. वाटेत हिरवळलेली गावे, शेतं आणि डोंगराळ दृश्ये प्रवासाला खास बनवतात. चालता चालता वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा आणि झाडांच्या सावलीचा अनुभव प्रवासाला अधिक आनंददायी बनवतो.
कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण
जर तुम्ही अॅडव्हेंचरप्रेमी, ट्रॅव्हल ब्लॉगर किंवा फोटोग्राफीचे शौकीन असाल, तर ऐना पहारा धबधबा नक्कीच तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. शहराच्या गोंधळापासून दूर, शांत आणि निसर्गमय वातावरण तुमच्या मनाला नवचैतन्य देईल. हत्तीच्या आकाराच्या चट्टानांवरून वाहणारे पाणी फोटोंसाठी एक अप्रतिम पार्श्वभूमी तयार करते.
कसे पोहोचाल इथे