बॉस्टन येथील नीता अंबांनीचा लुक व्हायरल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. या महिला उद्योगपतीने अलीकडेच बोस्टनमधील संग्रहालयात त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या एका खास डिनरला हजेरी लावली. या डिनरमध्ये कला, संस्कृती आणि समाजातील त्यांच्या असाधारण योगदानाची दखल घेण्यात आली होती. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते नीता अंबानी यांनी नेसलेल्या भारतीय संस्कृतीच्या चिकनकारी साडीने. काही वेळातच नेहमीप्रमाणे नीता अंबानी यांचा हा लुक व्हायरल झालेला दिसून येतोय.
नीता अंबानी या जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेल्या तरीही भारतीय संस्कृतीमधील विविध साड्या नेसण्याला प्राधान्य देतात. यावेळी त्यांनी बॉस्टन येथील डिनरसाठी चिकनकारी साडीची निवड केली आहे. ही साडी अत्यंत क्लासी असून एखाद्या महाराणीचा लुक आणून देते. बॉस्टनच्या डिनरसाठी नीता अंबानी यांनी नक्की कसा पेहराव केला आहे, एक नजर टाकूया या क्लासी लुकवर
Ivory चिकनकारी साडी
चिकनकारी साडीची स्टाईल
या खास प्रसंगासाठी नीता अंबानी यांनी डिझाईनर अनामिका खन्नाच्या शेल्फमधून चिकनकारी साडी निवडली. हस्तिदंती रंगाच्या अर्थात या Ivory रंगाच्या साडीवर अत्यंत बारीक कलाकुसरीचे भरतकाम आणि नाजूक लेसचे डिझाईन करण्यात आले आहे. यामुळे नीता अंबानी यांच्या लूुकमध्ये एक राजेशाही आणि मोहकपणा आल्याचे दिसून येत आहे. यासह नीता अंबानी यांनी सिल्कचा ब्लाऊज घातला असून अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत.
शपथविधी Donald Trump चा पण चर्चा नीता अंबानीच्या कांचीपुरम सिल्कची, उपस्थिती लावत जपली भारतीय परंपरा
आंबाडा घालून माळले फूल
नीता अंबानी यांची देसी हेअरस्टाईल
नीता अंबानी यांनी त्यांचे केस मध्यभागी विभाजित करून अंबाडा बांधला आहे आणि त्यावर एक सुंदर पांढरे फूल घातले, ज्यामुळे त्यांच्या लुकमध्ये सौंदर्याची भर पडली आहे. हेअरस्टाईलमुळे त्यांच्या सौंदर्याला चारचाँद लागले असून लुकमध्ये अधिक उठाव आलाय.
नो मेकअप लुक
मिनिमल मेकअपमधील सौंदर्य
चिकनकारी साडीसह त्यांनी अत्यंत मिनिमल असा मेकअप लुक ठेवलाय ज्याला आजकाल ट्रेंडमध्ये लो मेकअप लुक असे म्हटले जाते. यासाठी नीता अंबानी यांनी डार्क भुवया, काजळ, आयलायनल, मस्कारा आणि त्याला आयलॅशेस लावल्या आहेत. मेकअप बेससाठी फाऊंडेशन, कन्सीलर, हायलाटरचा वापर केल्याचे दिसून येत आहे. तर डोळ्यांना आयशॅडोचा हलकासा टच दिसतोय. ओठांना न्यूड ब्राऊन शेड लिपस्टिक लावत आपला लुक पूर्ण केलाय
केसांचा Volume होईल क्लास, Nita Ambani च्या हेअरस्टायलिस्टने शेअर केली पद्धत
रत्नांशिवाय साज अपूर्ण
दागिन्यांचा क्लासी लुक
नीता अंबानी या खरं तर रत्नांच्या राणी आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले. या चिकनकारी साडीसह त्यांनी आकर्षक दोन पदरी पन्ना अर्थात पाचूचा हार घातला आहे आणि त्याच्या मध्यभागी हिरा जडला आहे, ज्यामुळे त्या दागिन्यांवरील नजर हटवणेही कठीण झाले आहे. या हारासह कानात हिऱ्याच्या कानातले, पाचूची अंगठी आणि एक नाजूक हिऱ्याच्या ब्रेसलेटसह त्यांनी लुक पूर्ण केलाय