नीता अंबानी यांनी लावली डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थिती
नीता अंबानी या नेहमीच आपल्या फॅशनने सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. तर अधिक वेळेला त्या भारतीय परंपरा जपत साडी नेसण्यासा प्राधान्य देतात. नुकताच याचा पुन्हा प्रत्यय आलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला खास आमंत्रण मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना देण्यात आले असून दोघांनीही उपस्थिती लावली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी नीता अंबानी यांनी खास भारतीय परंपरा दर्शविणारी कांचीपुरम साडी नेसून उपस्थिती लावली. कसा होता नीता अंबानी यांचा हा लुक आणि काय आहेत या साडीची वैशिष्ट्य जाणून घ्या. ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राने स्टाईल केली असून याची खासियत त्याने सोशल मीडियावर सांगितली आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
नीता अंबानी यांची खास साडी
नीता अंबानीने नेसली कांचीपुरम साडी
नीता अंबानी यांनी स्वदेश ब्रँडने बनवलेली एक सुंदर कांचीपुरम सिल्क साडी परिधान केली होती, जी कांचीपुरमच्या मंदिरांपासून प्रेरित १०० हून अधिक पारंपारिक आकृतिबंधांनी डिझाइन केलेली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर बी. कृष्णमूर्ती यांनी विणलेल्या या साडीत इरुथलाईपक्षी अर्थात भगवान विष्णूचे प्रतीक असलेले दुहेरी डोके असलेले गरुड, मयिल अर्थात देवत्व आणि अमरत्वाचे प्रतीक आणि सोरगावसल-प्रेरित नमुने अर्थात भारताच्या लोककथांचे उत्सव साजरा करणारे असे विविध डिझाईन्स साकारण्यात आले असून ही हँडलूम साडी आहे.
‘तेनू काला चष्मा जचदा’, सायली संजीवचा स्वॅग, चाहते म्हणतात ‘तुझ्या एका हास्यासाठी चंद्रसुद्धा जागतो’
देण्यात आला खास भारतीय टच
साडीला देण्यात आला खास भारतीय टच
समकालीन शैलीचा अनुभव देण्यासाठी, साडीला कस्टम मेड वेल्वेट ब्लाउजसह जोडण्यात आले होते ज्यामध्ये बिल्ट-अप नेकलाइन आणि बाह्यांवर तपशीलवार मणीकाम करण्यात आले आहे, ज संपूर्ण परंपरेला समकालीन शैलीशी जोडते. वेलवेटचा हा ब्लॅक ब्लाऊज या साडीसह परफेक्ट मॅच होत आहे आणि नीता अंबानी यांचा लुक अधिक रॉयल ठरतोय
दुर्मिळ दागिन्यांचा सेट
साडीसह खास दागिन्यांचे डिझाईन
तसंच नीता अंबानी यांनी त्यांचा लुक २०० वर्ष जुन्या दुर्मिळ भारतीय पेंडेंटने पूर्ण केला आहे. या संपूर्ण हार पाचू, माणिक, हिरे आणि मोत्यांनी सजवलेला आहे आणि जो कुंदन तंत्राचा वापर करून लाल आणि हिरव्या मुलामा चढवून बनविण्यात आलाय. याशिवाय नीता अंबानी यांनी कानातही पाचूजडित सुंदर डिझाईनचे कानातले घातले होते. त्यांच्या कांचीपुरम साडीला हे दागिने परफेक्ट मिसमॅच होत आहेत. तर हातातही कुंदन आणि पाचूजडित ब्रेसलेट त्यांनी घातलेले दिसून आले.
‘हुस्न के लाख रंग’, प्राजक्ताचा नखरा पाहण्यासाठी चाहते मारतातय इंटरनेटवर सतत चकरा
हेअरस्टाईल आणि मेकअप
नीता अंबानींची स्टाईल
याशिवाय नीता अंबानी यांनी साडीसह हेअरस्टाईललादेखील भारतीय टच देत अंबाडा घातला होता आणि केसांना पुढून वेव्ही लुक दिला आहे. तर नेहमीप्रमाणे त्यांनी ग्लॉसी मेकअप केला असून या साडीवर हा मेकअप खूपच रॉयल आणि क्लासी दिसतोय. फाऊंडेशन बेस, हायलायटर, काजळ, लायनर, आयलॅशेस, आयशॅडो आणि ग्लॉसी न्यूड लिपस्टिक शेड लावत त्यांनी आपला लुक पूर्ण केलाय.