Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

No Tobacco Day: पालकांची भूमिका महत्त्वाची, मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

सध्या लहान मुलांमध्ये धुम्रपान आणि अन्य व्यसनांपासून दूर ठेवण्याची गरज आहे. नो टोबॅको डे च्या दिवसानिमित्त पालकांनी वेळीच मुलांना सांभाळायला हवं. तज्ज्ञांनी मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा इशारा ठेवलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 31, 2025 | 07:11 PM
तंबाखूमुक्त दिनानिमित्त तज्ज्ञांनी दिला पालकांना इशारा

तंबाखूमुक्त दिनानिमित्त तज्ज्ञांनी दिला पालकांना इशारा

Follow Us
Close
Follow Us:

किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान आणि ई- सिगारेटच्या व्यसनाचे  प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. किशोरवयीन मुलं या सवयी एक ट्रेंड म्हणून स्वीकारतात जे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. सर्वात आधी पालकांनी स्वतःला याबाबत  शिक्षित करणे आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांविषयी मुलांशी मनमोकळा संवाद साधणे गरजेचे आहे.

धूम्रपान आणि ई सिगारेटचे व्यसन हे केवळ प्रौढांमध्येच नाही तर किशोरवयीन मुलांमध्येही सामान्यपण आढळून येत आहे. किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान आणि ई सिगारेटच्या सवयीच वाढ होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत.  ई सिगारेट सारख्या साधनांची आकर्षक रचना,  विविध प्राकरचा चवींची उपलब्धता आणि दिवसेंदिवस त्याचे वाढते मार्केटिंग ही उत्पादने १३-१९ वयोगटातील तरुणांना आकर्षक बनवतात. त्याचप्रमाणे समवयस्क मित्रांचा दबाव, म्हणजेच प्रौढ दिसण्याची किंवा प्रौढांमध्ये उठ-बस करण्याची इच्छा ही किशोरवयीन मुलांना तंबाखू उत्पादनांच्या सेवनास भाग पाडते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान आणि ई सिगारेटसारख्या व्यसनाला आकर्षक ठरविण्यास भाग पाडते. बरेच किशोरवयीन मुलं आ सिगारेट, सिगारेट, धूररहित तंबाखू आणि हुक्का यांचा सर्रासपणे वापर करतात. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान आणि ई सिगारेटचे व्यसन वाढल्याची प्रतिक्रिया डॉ. शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी स्पष्ट केले

तज्ज्ञांनी काय सांगितले 

डॉ. शाहिद पटेल पुढे सांगतात की, १३ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धूम्रपान आणि व्हेपिंगशी संबंधित धोक्यांबाबत शिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे. किशोरावस्थेत निकोटीनच्या सेवनाने मेंदूच्या विकासात अडथळ येऊ शकतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे, शिक्षण  घेणे आणि वैयक्तिक विकासात परिणाम होतो. 

धूम्रपान किशोरवयीने मुलांमध्ये फुफ्फुसांच्या विकासास हानीकारक ठरते, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते आणि दमा, ब्राँकायटिस आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) चा धोका वाढतो. यामुळे वीएएलआय (VALI) -व्हेप असोसिएटेड लंग इंज्युरी नावाचा एक नवीन आजार आढळून येऊ लागला आहे,ज्याचा आतापर्यंत कोणताही इलाज नाही आणि तो अनेक प्रकरणांमध्ये घातक ठरला आहे. याचा मेंदूच्या विकासावर, स्मरणशक्तीवर, एकाग्रतेवर आणि एकूण आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी लोकं व्हेपिंग ई-सिगारेटचा करतात वापर, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम आणि धोके

व्यसनांबाबत काय दिला सल्ला 

पालकांनी तंबाखू, निकोटीन आणि हल्ली किशोरवयीन मुले वापरत असलेल्या व्यसनांच्या पर्यायाबाबत स्वतःला शिक्षित केले पाहिजे. धूम्रपान त्यांना तात्पुरते समाधान देऊ शकते, परंतु श्वसन आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. धूम्रपान आणि व्हेपिंग हे दोन्ही फुफ्फुसांना हानिकारक रसायनांच्या संपर्कात आणतात जे नाजूक ऊती आणि श्वसनमार्गांना नुकसान पोहोचवतात. कालांतराने दीर्घकालीन दाह निर्माण होतो, फुफ्फुसांची क्षमता कमी होते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. 

धूम्रपान आणि व्हेपिंग दरम्यान श्वासावाटे घेतले जाणारे अनेक पदार्थ जसे की, फॉर्मल्डिहाइड आणि बेंझिन हे कार्सिनोजेनिक असतात आणि फुफ्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. किशोरवयीन मुलांशी उघडपणे संवाद साधल्यास त्यांना धूम्रपान आणि व्हेपिंगचे परिणाम समजण्यास मदत होऊ शकते. पालकांनी आपल्या मुलांना धूम्रपानाची सवय सोडण्यास आणि फुफ्फुसांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया डॉ. सुप्रिया बांबरकर ऑन्कोसर्जन, एम्स हॅास्पिटल, डोंबिवली यांनी व्यक्त केली

समुपदेशकांची मदत 

पालकांनी मुलांना व्यसन सोडण्याकरिता असलेल्या सपोर्ट ग्रुप किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी. किशोरवयीन मुलांना हे समजून घेणे आवश्यक आहे की धूम्रपान आणि व्हेपिंगमुळे गंभीर व्यसन आणि आरोग्यासंबंधी दीर्घकालीन समस्या उद्भवतात. या वाईट सवयी वेळीच सोडणे मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते,अशी प्रतिक्रिया डॉ. शाहिद पटेल यांनी व्यक्त केली.

2030 पर्यंत जगामध्‍ये 80 लाखापेक्षा जास्‍त मृत्‍यू तंबाखूच्‍या सेवनामुळे – तज्ज्ञांचा इशारा

डॉ. रीटा मोदी, वरीष्ठ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, मदरहुड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ, खारघर तंबाखू आणि ई-सिगारेटमधील निकोटीन हे हार्मोन उत्पादनावर परिणाम करू शकते, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी करते तर, महिलांमध्ये मासिक पाळी आणि ओव्हुलेशनमध्ये व्यत्यय आणते. कालांतराने, हे त्यांच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकते. किशोरावस्था ही शारीरीक वाढ आणि हार्मोनल संतुलनासाठीचा महत्त्वाचा टप्पा असून विषारी पदार्थांचा सेवनाने एखाद्याच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचू शकते. 

किशोरावस्थेतील हे व्यसन भविष्यात प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे आहे. म्हणूनच, १३ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलांन नियमितपणे व्यायाम करण्यास, संतुलित आहाराचे सेवन करण्यास, योग आणि ध्यानाद्वारे तणावाचे व्यवस्थापित करण्यास तसेच सामाजिक दबावाबद्दल पालकांशी मनमोकळी चर्चा करण्यास मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. याकरिता विशेष थेरपी जसे की, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आणि तणाव किंवा सोशल मीडियाच्या प्रभावासारखे ट्रिगर्स जाणून घेणे गरजेचे आहे. धूम्रपान आणि व्हेपिंगसारख्या सवयी टाळल्याने केवळ प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.

Web Title: No tobacco day the role of parents is important experts warn to keep children away from addiction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 07:11 PM

Topics:  

  • Alcohol
  • Health News
  • smoking

संबंधित बातम्या

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
1

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
2

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत
3

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त
4

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.