Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugarcane Workers: उसाच्या शेतांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी अन्…; राज्यमंत्र्यांचे निर्देश काय?

Sugarcane Workers: राज्यातील विविध साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने उसतोड मजूर कामासाठी आपल्या कुटुंबासह घराबाहेर पडले आहेत. कारखाना परिसरात आणि शेतांमध्ये त्यांच्या तात्पुरत्या वस्त्या तयार झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 10, 2026 | 06:18 PM
Maharashtra Health Department

Maharashtra Health Department

Follow Us
Follow Us:
  • उसतोड मजुरांच्या बालकांसाठी राबविणार ‘बालसंजीवनी’ अभियान
  • स्थलांतरित मजुरांच्या बालकांची विशेष आरोग्य तपासणी व लसीकरण
  • आरोग्य यंत्रणेला राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश
Sugarcane Workers: राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उसतोड मजुरांसोबत स्थलांतरित होणाऱ्या बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांच्या तात्पुरत्या वस्त्यांवर ‘बालसंजीवनी’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत कारखाना परिसर तसेच उसाच्या शेतांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी, आवश्यक उपचार आणि लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

राज्यातील विविध साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने उसतोड मजूर कामासाठी आपल्या कुटुंबासह घराबाहेर पडले आहेत. कारखाना परिसरात आणि शेतांमध्ये त्यांच्या तात्पुरत्या वस्त्या तयार झाल्या आहेत. या मजुरांसोबत मोठ्या संख्येने लहान मुलेही स्थलांतरित होत आहेत. मात्र, स्थलांतराच्या काळात या बालकांना नियमित आरोग्य सेवा, तपासणी आणि लसीकरणाच्या सुविधा मिळण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी

कुपोषण, रक्तक्षयासह विविध आजारांची तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) स्थलांतरित प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कुपोषण, रक्तक्षय, बालविकासातील विलंब, जन्मजात व्यंग तसेच संसर्गजन्य आजारांची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार केले जातील. या मोहिमेत संबंधित भागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाचा सहभाग घेतला जाणार आहे.

कारखानानिहाय नियोजन करण्याचे निर्देश

अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व साखर कारखान्यांची यादी तयार करणे, कारखाना परिसरातील कामगारांच्या पालांचे आणि तात्पुरत्या वस्त्यांचे सर्वेक्षण करणे, तसेच याच ठिकाणी बालकांचे आवश्यक लसीकरण करण्याबाबत आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना राज्यमंत्री बोर्डीकर यांनी निर्देश दिले आहेत.

Satara News: ‘शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊ नका, साखर सम्राटांची मस्ती उतरवू’; ऊसदरावरून राजू शेळके आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

बालकांच्या आरोग्यासाठी मजुरांची फरफट थांबविणार

उसतोड मजूर अनेक दिवस कुटुंबासह घरापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत मुलांच्या आजारपणात उपचारांसाठी आरोग्य केंद्रापर्यंत जाणे, नियमित तपासणी करणे आणि लसीकरण करून घेणे मजुरांना शक्य होत नाही. कामाच्या व्यापामुळे बालकांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने थेट मजुरांच्या पालांपर्यंत पोहोचून सेवा देणे आवश्यक आहे. बालकांच्या आजारपणात पालकांची होणारी धावपळ आणि फरफट थांबविणे, तसेच स्थलांतरित बालकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, हा ‘बालसंजीवनी’ अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उसतोड मजुरांच्या बालकांसाठी कोणते अभियान राबविले जाणार आहे?

    Ans: उसतोड मजुरांच्या बालकांसाठी ‘बालसंजीवनी’ अभियान राबविण्यात येणार आहे.

  • Que: राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश काय आहेत?

    Ans: बालकांची आरोग्य तपासणी, आवश्यक उपचार आणि लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

Web Title: State minister meghna brordikar sugarcane workers childrens balsanjivani campeign tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Child Health
  • Farmers
  • Health News
  • sugarcane workers

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
1

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

Shambhuraj Desai: शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी
2

Shambhuraj Desai: शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी

Satara News: ‘शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊ नका, साखर सम्राटांची मस्ती उतरवू’; ऊसदरावरून राजू शेळके आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा
3

Satara News: ‘शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊ नका, साखर सम्राटांची मस्ती उतरवू’; ऊसदरावरून राजू शेळके आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांसाठी संजय राठोडांची मोठी घोषणा! मुलांच्या शिक्षणापासून आरोग्य सुविधांपर्यंत सरकारचा मोठा प्लॅन
4

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांसाठी संजय राठोडांची मोठी घोषणा! मुलांच्या शिक्षणापासून आरोग्य सुविधांपर्यंत सरकारचा मोठा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.