Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palak Paneer Recipe: चवीला मजेदार आणि पौष्टिक असा हॉटेलचा लोकप्रिय पदार्थ आता घरीच बनवा

हॉटेलमध्ये गेलो की तिथल्या मेन्यूत आवर्जून समाविष्ट केला जाणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर! पौष्टिकतेने भरलेली ही भाजी चवीला फार छान लागते आणि अनेकांचे मन जिंकते. चला तर मग ही भाजी घरी कशी तयार करायची ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2025 | 09:52 AM
Palak Paneer Recipe: चवीला मजेदार आणि पौष्टिक असा हॉटेलचा लोकप्रिय पदार्थ आता घरीच बनवा

Palak Paneer Recipe: चवीला मजेदार आणि पौष्टिक असा हॉटेलचा लोकप्रिय पदार्थ आता घरीच बनवा

Follow Us
Follow Us:

अनेकदा आपण बाहेर खायला गेलो की काही निवडक पदार्थ हे हॉटेलच्या मेन्यूमध्ये आवर्जून समाविष्ट असतात आणि यातीलच एक म्हणजे पालक पनीर! पालकची प्युरी आणि त्यात शिजवलेले पनीरचे तुकडे यांची मिश्रित अशी ही भाजी चवीला फार छान आणि लज्जतदार लागते. अनेकांना पालकची भाजी तितकी खायला आवडत नाही अशात तुम्ही यापासून टेस्टी असा पालक पनीर बनवून याचा आनंद लुटू शकता.

रात्रीचे जेवण होईल आणखीनच चवदार! झटपट घरी बनवा स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव, नोट करून घ्या रेसिपी

पालक पनीर ही एक लोकप्रिय उत्तर भारतीय डिश आहे जी खासकरून पंजाबी भोजनात पाहायला मिळते. ही डिश पोळी, पराठा किंवा भातासोबत खाल्ली जाते. पौष्टिकता आणि चव यांचा उत्कृष्ट संगम असलेली ही भाजी सर्वांनाच खायला फार आवडते आणि म्हणूनच आता याची एक सोपी आणि हॉटेल स्टाईल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • पालक – २ मोठी जुडी
  • पनीर – २०० ग्रॅम (चौकोनी तुकडे करून)
  • कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो – १ मध्यम (बारीक चिरलेला)
  • आले-लसूण पेस्ट – १ चमचा
  • हिरवी मिरची – २
  • जिरे – १/२ चमचा
  • हळद – १/४ चमचा
  • धणेपूड – १ चमचा
  • गरम मसाला – १/२ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल/लोणी – २ चमचे
  • तूप (ऐच्छिक) – १ चमचा
  • फ्रेश क्रीम – १ चमचा (ऐच्छिक)
मार्केट स्टाईल सर्वांच्या आवडीचा लसूण चिवडा आता घरीच बनवा; व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी

कृती

  • पालक पनीर तयार करण्यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवा आणि उकळत्या पाण्यात २-३ मिनिटं शिजवा.
  • मग हे उकळलेले पनीरचे तुकडे थंड पाण्यात टाका आणि मिक्सरमध्ये हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट बनवा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि आले-लसूण पेस्ट घाला. सुवास येईपर्यंत परता.
  • त्यात चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा. मग टोमॅटो घालून नरम होईपर्यंत परतून घ्या.
  • आता हळद, धणेपूड आणि मीठ घालून १ मिनिट शिजवा.
  • त्यात पालक पेस्ट घालून ५-७ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
  • नंतर पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा. २-३ मिनिटं शिजवा.
  • शेवटी गरम मसाला आणि क्रीम घालून एक मिनिट उकळा. वरून तूप टाकल्यास अधिक चविष्ट लागते.
  • गरम गरम पालक पनीर पोळी, पराठा, नान किंवा जीरा राईससोबत खाणयासाठी सर्व्ह करू शकता.
    पनीर तळूनही वापरू शकता, पण तो हलका नरम ठेवण्यासाठी न तळलेलाच वापरणे उत्तम ठरेल.

Web Title: Note down hotel style palak paneer recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • marathi recipe
  • paneer fry
  • tasty food

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.