झटपट घरी बनवा स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव
मुंबईच्या प्रत्येक गळ्यांमध्ये काहींना काही स्ट्रीट फूड मिळतेच. चायनीज,पाणीपुरी, शेवपुरी इत्यादी अनेक पदार्थ मिळतात. त्यातील सगळ्यांचा आवडता स्ट्रीट स्टाईल पदार्थ म्हणजे चिकन खिमा पाव. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिकन खायला खूप आवडत. चिकनच नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. लाला तिखट आणि इतर मसाल्यांमध्ये फ्राय केलेले चिकन चवीला अतिशय सुंदर लागते. चिकनसोबत पाव खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पण नेहमी नेहमी बाहेरील विकतचा खिमा पाव खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही चिकन खिमा पाव खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया चिकन खिमा पाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळा होईल आणखीनच भारी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम सूप, नोट करा हेल्दी रेसिपी