पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकरचा मोलाचा सल्ला
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याची वेळ आलीये. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर लोकांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी दररोज इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असतात. ऋजुता दिवेकरने लॉकडाऊन १ आणि २ दरम्यान सर्वोत्तम अन्नपदार्थांसह व्यायाम आणि डाएट योजना सोशल मीडियावर शेअर केली होती.
पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकरच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाने पारंपारिक गोष्टी बनवण्याची आणि खाण्याची सवय लावली पाहिजे. त्यांनी लॉकडाऊन दरम्यान एक उत्तम प्लान दिला होता ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळू शकते, जाणून घेऊया (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
ऋजुताने काय सांगितले
पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने म्हटले की, ‘आता भारतीय अन्नाची साखळी पुन्हा आपल्या आहारात समाविष्ट करण्याची वेळ आली आहे. एका प्रकारे, मी लॉकडाऊनला घरगुती ज्ञानाशी आपला संपर्क पुन्हा स्थापित करण्याची संधी म्हणून पाहते. तसेच, या पदार्थांमुळे आपल्या बालपणीच्या आठवणीदेखील ताज्या होऊ शकतात.
ऋजुताची पोस्ट
दिवसाची सुरुवात
हेल्दी नाश्त्याने करा सुरूवात
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केळी खाऊन करू शकता. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. यासोबतच तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुके खाऊ शकता. यामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार टाळण्यास मदत होईल. मनुके पीएमएस आणि थायरॉईडपासून आराम देतील.
सकाळचा नाश्ता
घरातील पदार्थांपासून बनवलेला नाश्ता तुमचे मन शांत ठेवण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही योग्य ठेवेल. म्हणून, तुम्ही नाश्त्यात पोहे, उपमा, इडली, डोसा, पराठा, अंडी आणि पाव यासारख्या गोष्टी खाऊ शकता. नाश्त्याच्यावेळी पातळ पदार्थांसोबत व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे सेवन करा. यामध्ये तुम्ही लिंबू, कोकम किंवा आवळा सरबत किंवा इतर कोणत्याही फळाचा रस घेऊ शकता.
दुपारचे जेवण
प्रतिकारशक्ती वाढवणारे जेवण जेवा
दुपारच्या जेवणात तुम्ही डाळ-भात किंवा रोटी-भाजीसोबत चटणी खाऊ शकता. जर शरीरात बी-१२, डी सारख्या मॅक्रोन्यूट्रिएंट्सची कमतरता असेल तर केळी, साखर, दूध आणि चपातीपासून बनवलेले शिकंजी पोळी खा.
याशिवाय दुपारच्या जेवणानंतर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे, गूळ किंवा काजू आणि गूळापासून बनवलेले काहीतरी खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मटरी, शंकरपाळे, कुरमुरे, चिवडा किंवा चकलीसारखे काहीतरी हलका आणि कोरडा नाश्ता खाऊ शकता. यामुळे तुमचे मन निरोगी राहील आणि आवश्यक चरबी आणि खनिजे पूर्ण होतील.
ऑफिसमध्ये बसून वाढते वजन? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचा कानमंत्र वाचून झर्रकन व्हा बारीक
रात्रीचे जेवण
रात्री हलके जेवण जेवा
रात्रीच्या जेवणासाठी, तुम्ही खिचडी, भात, अंडी किंवा चीज मसूर किंवा बीन्ससह खाऊ शकता. त्यामध्ये अनावश्यक अमीनो अॅसिड आणि फायबर आढळतात, जे शरीरात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाचे संरक्षण करतात.
झोपण्यापूर्वी, एक ग्लास हळदीचे दूध तुम्ही प्यायलाच हवे कारण यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते आणि तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात जायफळदेखील घालू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल तर तुम्ही दुधात आले आणि केशर घालू शकता. याशिवाय, दररोज ३० मिनिटे व्यायाम करा आणि काही चांगल्या सवयी लावा. यामुळे तुमचा मूड चांगला राहील तसेच तुमचे शरीरही निरोगी राहील.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.