ऑफिसमध्ये तासंतास बसून राहिल्याने पोटावरील चरबी वाढण्याची समस्या अनेकांना उद्भवते. ऑफिसमध्ये आल्यानंतर अनेकजण घरी लवकर जाण्याच्या नांदात दिवसभर बसून आपले काम पूर्ण करतात. पण याचा आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. यामुळे प्रामुख्याने वजन वाढणं ही समस्या जाणवते. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात.
तासनतास ऑफिसमध्ये बसून राहणं हे वजन वाढण्या मागचं एकमेव कारण आहे. पण ऑफिसमध्ये बसून तुमचेदेखील वजन वाढले आहे का? तर तुमच्या आहारात बदल करून वजन नियंत्रणात आणू शकता. वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत काही टिप्स दिल्या आहेत. ऑफिसमध्ये बसून वजन का वाढत? आणि वाढलेलं वजन कसं कमी करायचं याबद्दल ऋजुता दिवेकर यांनी टिप्स दिल्या आहेत. चला तर जाणून घेऊया.
[read_also content=”एड्स लस दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास https://www.navarashtra.com/lifestyle/why-is-aids-vaccine-day-celebrated-learn-the-history-nrsk-534548.html”]
ऑफिसमध्ये बसून वजन का वाढतं?
बहुतांश लोक ९ ते ६ या वेळेमध्ये ऑफिसचं काम करण्यासाठी ऑफिसमध्ये येतात. आल्यानंतर ते तासंतास एकाच जागेवर बसून राहतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात.त्यामुळे शरीरातील कॅलरीज कमी बर्न झाल्यामुळे झपाट्याने वजन वाढू लागते. तसेच ऑफिसमध्ये काम करत असताना आपण सतत काहींना काही खात पित असतो. यामुळेसुद्धा वजन वाढू शकते.
आरोग्याची नीट काळजी न घेणे
एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहिल्याने कॅलरीज जळण्याऐवजी शरीरामध्ये जमा होऊ लागतात. त्याचे रूपांतर फॅटमध्ये होते. पण काहीवेळेस ८ ते ९ तास काम करून खूप थकून जातो. त्यामुळे इच्छा असूनसुद्धा आरोग्याची नीट काळजी घेता येत नाही. यामुळे वजन वाढण्यासारख्या अनेक समस्या जाणवू लागतात.
वाढलेले वजन नियंत्रणात कसे आणायचे: