Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यातील ही फळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण काढतील बाहेर, भरपूर खा; डॉक्टरांनी दिलाय सल्ला

Healthy Fruits : हिवाळ्यात प्रदुषणाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे फुफ्फुसांची खास काळजी घ्यावी लागते. अशात न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी 8 हेल्दी फ्रुट्सची नावे शेअर केली आहेत जे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 01, 2025 | 08:15 PM
हिवाळ्यातील ही फळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण काढतील बाहेर, भरपूर खा; डॉक्टरांनी दिलाय सल्ला

हिवाळ्यातील ही फळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण काढतील बाहेर, भरपूर खा; डॉक्टरांनी दिलाय सल्ला

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे फुफ्फुसांचे कार्य कमी होते
  • काही हेल्दी फळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात
  • आपण आवर्जून आपल्या आहारात या फळांचे सेवन करायला हवे

हिवाळा ऋतू आता सुरु होण्याच्या वाटेवर आहे. या सणात अनेक हंगामी भाज्या आणि फळे बाजारात उपलब्ध होऊ लागतात. यांची खासियत म्हणजे या भाज्या आणि फळे फक्त या सीजनमध्येच उपलब्ध होतात, तसेच ते आरोग्याला अनेक फायदे मिळवून देतात. थंडीमध्ये अनेक किरकोळ आजार जन्म घेतात ज्यामुळे आपल्या आहाराकडे वशेष लक्ष द्यायला हवे. थंडीमध्ये फुफ्फुसांचे कार्य कमी होते. पण काळजी करण्याची गरज नाही कारण नुकतेच फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधनातून काही फळांचे सेवन फायद्याचे असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी सांगितले की, प्रदूषणाच्या संपर्कात येण्यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो. हे मुक्त रॅडिकल्स फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहोचवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. यामुळे निरोगी लोकांच्या श्वसनमार्गालाही हानी पोहोचू शकते.

डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डार्क सर्कल होतील गायब

संशोधनातून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, जे जास्त भाज्या आणि फळे खातात त्यांना PM2.5 सारख्या प्रदूषणातही फुफ्फुसांच्या क्षमतेत लक्षणीय घट जाणवत नाही. निरोगी आहार आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे यातून अधोरेखित होते. युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी काँग्रेसमध्ये सादर केलेल्या २०२५ च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, चार किंवा त्याहून अधिक फळांचे सेवन करणाऱ्या महिलांचे आरोग्य कमी फळांचे सेवन करणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक चांगले असते. लिमा महाजन यांनी अशा काही फळांची नावे शेअर केली आहेत, ज्यांचे सेवन करुन तुम्ही तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य सुधारु शकता.

सफरचंद
एक सफरचंद खा आणि डाॅक्टरांना पळवा ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सफरचंद हे एक आरोग्यदायी फळ आहे, ज्याचे हिवाळ्यात आवर्जून सेवन करायला हवे. याचे सेवन फुफ्फुसातील जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करते.

पेरु
पेरु अनेकांच्या आवडीचे फळ आहे, तुम्ही रोजच्या आहारात याचे सेवन करु शकता. यामुळे प्रदूषणामुळे होणारे मुक्त रॅडिकल्स कमी होतात आणि फुफ्फुसांचे आरोग्य बनून राहते.

संत्री
संत्री फळात अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात जे श्वसनमार्गाचे संरक्षण करण्यास मदत करते. हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात संत्री उपलब्ध होते.

डाळिंब
लालचुटुक डाळींब रोज खाल्ल्याने शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो आणि पेशींच्या दुरुस्तीस मदत होते. तुम्ही सॅलड अथवा फ्रुट कस्टर्डमध्ये याचा समावेश करु शकता.

आवळा
नेहमीच बाजारात उपलब्ध असणाऱ्या आवळ्यासोबत लहानपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. यातील पोषक घटक सर्दी आणि प्रदूषणाचा ऑक्सिडेटिव्ह ताण फुफ्फुसांवर हल्ला करण्यापासून रोखते.

बेरी
बेरीडचे सेवन शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

पपई
आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास पपई मदत करते. याचे सेवन शरीरातील हानीकारक घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करते. यामुळे आतडे विषमुक्त राहतात. तसेच श्वसनाचे कार्यही यामुळे सुधारते.

चिकन-मटण सोडा, 50 रुपयांच्या या पदार्थांमध्ये दडलाय प्रोटीनचा साठा! आहारात करा समावेश; लोखंडासारखी मजबूत होतील हाडं

FAQ संबंधित प्रश्न

हिवाळ्यात फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखायचे?
उबदार राहा, चांगला श्वास घ्या, घरातील हवेची गुणवत्ता राखा, वायू प्रदूषणापासून सावध रहा, धूम्रपान आणि त्रासदायक पदार्थ टाळा, हायड्रेटेड रहा.

थंड हवामानात फुफ्फुसांचे काय होते?
थंड हवेमुळे तुमचे वायुमार्ग अरुंद होऊ शकतात. यामुळे तुमच्यातील श्लेष्माचे प्रमाण वाढू शकते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Nutritionist suggested 8 fruits which makes lungs healthy and strong in winter lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • healthy fruits
  • Lung health
  • winter health tips

संबंधित बातम्या

दिवाळीनंतरच्या हवेचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, तज्ज्ञांनी दिला सोपा उपाय
1

दिवाळीनंतरच्या हवेचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, तज्ज्ञांनी दिला सोपा उपाय

फायबरयुक्त पेरूचे हिवाळ्यात करा सेवन! सर्दी खोकल्यापासून कायमच दूर राहण्यासाठी ‘या’ वेळी करा सेवन, शरीर राहील निरोगी
2

फायबरयुक्त पेरूचे हिवाळ्यात करा सेवन! सर्दी खोकल्यापासून कायमच दूर राहण्यासाठी ‘या’ वेळी करा सेवन, शरीर राहील निरोगी

वाढत्या थंडी शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ सूपचे सेवन, कायमच राहाल निरोगी
3

वाढत्या थंडी शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ सूपचे सेवन, कायमच राहाल निरोगी

हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश, तब्येत राहील ठणठणीत
4

हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश, तब्येत राहील ठणठणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.