डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम
आजकाल महिलांसह पुरुषांच्या चेहऱ्यावर काळी वर्तुळ दिसून येतात. डोळ्यांभोवती काळी वर्तुळ येणं ही अतिशय सामान्य समस्या आहे. यामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि काळवंडल्यासारखी वाटते. अपुरी झोप, पोषणाचा आभाव, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मोबाईलचा अतिवापर, रात्रभर जागून काम करणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचेचा रंग फिका होऊन जातो. याशिवाय त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. डोळ्यांवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. याशिवाय वेगवेगळ्या ब्रँडच्या आय क्रीम लावल्या जातात. पण यामुळे त्वचेवर कोणताच फरक दिसून येत नाही. त्वचेवरील नैसर्गिक ग्लो कायम ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिकच सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे डोळे अतिशय उठावदार आणि सुंदर दिसतील.(फोटो सौजन्य – istock)
डोळ्यांवर आलेले काळे डाग घालवण्यासाठी काकडीच्या रसाचा वापर करावा. काकडीमध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे त्वचेवर ताजेपणा टिकून राहतो. यासाठी वाटीमध्ये काकडीचा रस घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करा. तयार केलेले मिश्रण कापसाच्या गोळ्यावर घेऊन हलक्या हाताने डोळ्यांखाली लावून घ्या. १५ ते मिनिट ठेवून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवर आलेली सूज आणि थकवा कमी होण्यास मदत होईल. याशिवाय काकडीचे काप डोळ्यांवर सुद्धा ठेवू शकता.
मागील अनेक वर्षांपासून गुलाब पाण्याचा वापर त्वचेवर वाढलेले काळे डाग आणि त्वचेच्या समस्यांसाठी केला जात आहे. डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी गुलाब पाणी लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल आणि थकवा कमी होण्यास मदत होईल. गुलाब पाणी केवळ डोळ्यांसाठीच नाहीतर संपूर्ण त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना बटाट्याचा वापर केला जातो. यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग एजंट असतात, ज्यामुळे त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी होण्यासोबतच त्वचेचा रंग सुद्धा उजळतो. कापसावर बटाट्याचा रस घेऊन डोळ्यांभोवती लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी होईल आणि डोळे अतिशय सुंदर दिसतील. बटाट्यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि टॅनिन्स डोळ्यांभोवती असलेल्या त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत करते.






