 
        
        (फोटो सौजन्य: istock)
वय वाढलं की आरोग्यच्या समस्या निर्माण होणं सामान्य गोष्ट आहे. जसजसे वय वाढते तसतशी अनेकांची हाडे कमकुवत होऊ लागतात आणि यामुळेच सांधेदुखी, स्नायू कमकुवत होणे, हातपायांमध्ये मुंग्या येणे, फ्रॅक्चरचा धोका अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. आजकाल तर वृद्ध लोकांनाच नाही तर अनेक तरुणांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोजच्या कामाच्या धावपळीत शरीर थकल्यासारखं वाटण, केसगळती आणि हाडांचं दुखणं हे सर्वच लोकांच्या जीवनाच्या एक भाग बनून राहिले आहेत.
Urine मध्ये दिसून येतात Kidney Damage चे संकेत, 5 बदल दिसताच त्वरीत भेटा डॉक्टरांना
या सर्व समस्यांचे मूळ कारण म्हणजे आपला चुकीचा आहार. आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. अशात शरीरात असणाऱ्या प्रोटीनचा साठा कमी झाला की या सर्व समस्या उद्भवू लागतात. यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरांच्या गोळ्या घेण्याची गरज नाही तर आपल्या आहारात काही प्रोटीनयुक्त पदर्थांचा समावेश करण्याची गरज आहे. अनेकांना असं वाटत की, प्रोटीन हे फक्त चिकन-मटण यामध्ये आढळून येत पण असं नाही. अनेक डाळी आणि भाज्यांमध्ये प्रोटीनचा भरपूर साठा आढळतो ज्यामुळे याचे सेवन करणे आपल्या हाडांना मजबूतीसाठी फायद्याचे ठरू शकते. फिटनेस कोच धर्मा कुमार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वस्त आणि सहज उपलब्ध असणाऱ्या प्रोटीनयुक्त पदार्थांची यादी सांगितली आहे. या पदार्थांच्या रोजच्या जीवनात समावेश केल्यास तुम्ही तुमचं शरीर मजबूत आणि बळकट बनवू शकता.
पनीर
पनीर हाडांसाठी फायदेशीर आहे, कारण त्यात कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आढळते. शाकाहारी लोकांसाठी हा प्रोटीनचा एक उत्तम साठा आहे. पनीरचे सेवन हाडांचे आरोग्य सुधारते आणि त्यांना निरगो ठेवण्यास मदत करते. बाजारात पनीर सहज उपलब्ध होते. भाजी, भुर्जी, पराठा अशा अनेक प्रकारे पनीरपासून चविष्ट पदार्थ तयार केले जाऊ शकतात.
अंडी
सकाळच्या नाश्त्यात खाल्ली जाणारी अंडी अनेक फायद्यांसह हाडांना मजबूत करण्यासही मदतनीस ठरते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक आढळून येतात जे हाडांची मजबूती राखण्यास मदत करतात. नियमित अंड्यांचे सेवन केल्याने हाडांची घनता वाढते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.
सोया चंक्स
सहज, सोपा आणि स्वस्त असणारा हा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचा ठरतो. यात कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आढळून येतो जे हाडे मजबूत करण्यास आणि हाडाने दुखणे कमी करण्यास मदत करते. हे पचनशक्ती सुधारण्यासही मदत करते.
काळे चणे, राजमा, मसूर छोले, चवळी
आहारात कडधान्यांचा समावेश आरोग्याला अनेक फायदे मिळवून देतो. काळे चणे, राजमा, मसूर डाळ, छोले आणि चवळी यांसारखे कडधान्य फार स्वस्त दरात बाजारात उपलब्ध असतात. यापासून चविष्ट अशी भाजी तयार केली जाऊ शकते. रोजच्या आहारात यांचा समावेश केल्यास शरीरातील प्रोटीन आणि आयर्नचा साठा भरला जातो. हे शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासही मदत करते.
बेसन
अनेक भारतीय स्वयंपाकघरात बेसनाचा आवर्जून समावेश होतो. यापासून तयार केलेले पदार्थ चवीला फार स्वादिष्ट लागतात. पण अनेकांना ठाऊक नाही की याचे सेवन आपल्या हाडांच्या मजबुतीसाठीही फायद्याचे ठरते. यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने यांसारखे पोषक तत्व असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
दही
फक्त पचनासाठीच नाही तर हाडांना मजबुती मिळवून देण्यासाठीही दहीचे सेवन केले जाऊ शकते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि फ्रॅक्चरनंतर बरे होण्यास मदत करण्यासाठी दहीचे सेवन उपयुक्त ठरते. यातील पोषक घटक त्वचेला आतून पोषण देण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते.
माझी हाडे निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे?
तुमच्या आहारात भरपूर कॅल्शियमचा समावेश करा, पुरेसे व्हिटॅमिन डी घ्या, तंबाखूचे सेवन करू नका किंवा जास्त मद्यपान करू नका.
हाडे मजबूत कशामुळे होतात?
आहार आणि व्यायामाच्या संयोजनाने हाडे मजबूत राहतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






