
संत्र्याची साल आणेल चेहऱ्यावर चमकदार ग्लो! 'या' पद्धतीने घरीच बनवा फेसमास्क
बदलत्या ऋतूंचा परिणाम आरोग्यासोबतच चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. राज्यात कधी ऊन तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. दमट वातावरणात जास्त वेळ बाहेर फिरल्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग वाढण्यासोबतच त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर जमा होणाऱ्या अतिरिक्त तेलामुळे त्वचा अधिकच तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करतात. मात्र सतत केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा अधिकच खराब होऊन जाते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त खराब होते. त्वचा कोरडी पडणे, निस्तेज होणे, चेहरा खडबडीत होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावरील त्वचा काळी झाल्यानंतर महिला पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. मात्र यामुळे काही दिवसाचं चेहऱ्यावर ग्लो राहतो. मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी संत्र्याचा वापर करावा. बाजारातून संत्री विकत आणली जाते. त्यानंतर त्यांची साल काढून फेकून दिली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालीची वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
संत्र्याच्या सालीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात संत्र्याची साल घालून बारीक पेस्ट करून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात दही, गुलाब पाणी आणि चिमूटभर हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. फेसपॅक तयार केलेल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हाताने हलकासा मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होईल आणि त्वचा सुंदर दिसेल. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचेसंबंधित समस्या बऱ्यापैकी कमी होतील आणि त्वचा कायमच ग्लोइंग राहील.
संत्र चवीला अतिशय सुंदर लागते. आंबट गोड संत्र खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. संत्र्याचे सेवन केल्यामुळे शरीराला जेवढे फायदे होतात तितकेच फायदे संत्र्याच्या सालीचे सुद्धा होतात. संत्र्यामध्ये असलेले विटामिन सी चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. चेहऱ्यावर जमा झालेला डेड स्किनचा थर कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर करावा. चेहऱ्यावर डाग, ठिपके, पिंपल्स किंवा पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर करावा.