लिव्हरच्या कर्करोगाचा त्रास कोणत्या पदार्थांमुळे होतो (फोटो सौजन्य - iStock)
लिव्हरच्या समस्यांबद्दल बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की लिव्हरच्या समस्या बहुतेकदा 40 ते 50 वर्षांच्या वयात होतात. मात्र हे अजिबात खरे नाही. यकृताचा कर्करोग 20 वर्षांच्या तरुण वयातही होऊ शकतो. भारतात फॅटी लिव्हरसारख्या लिव्हरच्या समस्यांचे प्रकरण गेल्या काही काळापासून वेगाने वाढत आहेत. बहुतेक लोक फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष करतात. जर फॅटी लिव्हर रोगावर उपचार केले नाहीत तर लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
आपली लाईफस्टाईल खूपच बदलली असून अजिबात वेळ नाहीये आणि त्यामुळे हेल्दी खाण्याकडे लक्षही दिले जात नाही. यामध्ये पास्ता, पिझ्झा, ब्रेड, पाव असे पदार्थ जास्त खाल्ले जात आहेत आणि यामुळे अनेकांना लिव्हर कॅन्सरसारखे आजार होत असल्याचेही अभ्यासात सांगण्यात येत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार प्रोसेस्ड फूड खाण्याने लिव्हर कॅन्सरमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येते. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
प्रोसेस्ड फूडचे सेवन
प्रोसेस्ड फूडचे सेवन ठरेल त्रासदायक
भारतात गेल्या काही वर्षांत लिव्हरच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लिव्हर कॅन्सरचे सर्वात मोठे कारण म्हणजे अस्वास्थ्यकर जीवनशैली. आजकाल तरुण लोक प्रक्रिया केलेले अन्न अर्थात प्रोसेस्ड फूड जास्त खातात. प्रक्रिया केलेले अन्न हळूहळू लिव्हर कमकुवत करू लागते. हे इतके हळूहळू घडते की एखाद्या व्यक्तीला नक्की आपल्यासह काय होतंय हे कळतही नाही.
फक्त दारूच नाही तर 5 पदार्थांनी सडते लिव्हर, होऊ शकतो Fatty Liver चा त्रास; सकाळी काय खावे?
काय खाऊ नये
कोणते पदार्थ खाणे टाळावे
यकृताच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी, प्रोसेस्ड फूड खाऊ नका. प्रक्रिया केलेले अन्न म्हणजे काय आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत ते जाणून घेऊया. जेव्हा गव्हापासून रिफाइंड पीठ बनवले जाते ज्याला आपण मैदा असेही म्हणतो तेव्हा ते प्रक्रिया केलेल्या अन्नात बदलते. बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज केलेल्या वस्तूदेखील प्रोसेस्ड फूड या प्रक्रियेत येतात. रिफाइंड पीठापासून बनवलेले सर्व काही प्रक्रिया केलेले अन्न आहे. रिफाइंड तेल, केक, पेस्ट्री, स्नॅक्स, चिप्स, भुजिया, चीज, बटर, ब्रेड इत्यादी सर्व प्रक्रिया केलेले अन्न आहेत. त्यामुळे या पदार्थांपासून आपण दूर रहावे आणि लहान मुलांनाही यापासून दूर ठेवावे.
डार्क कॉफीचे सेवन
ब्लॅक कॉफीचे सेवन प्रमाणात करावे
यकृत निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही दररोज १ कप डार्क कॉफी घेऊ शकता. डार्क कॉफीचे सेवन केल्याने फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. फॅटी लिव्हरपासून आराम मिळविण्यासाठी, कॉफी व्यतिरिक्त निरोगी आहार घ्या. जसे की हिरव्या भाज्या, ताजी फळे, कमी तेल आणि मसाले असलेले अन्न इत्यादी तुम्ही जेवणात समाविष्ट करून घ्या. मात्र डार्क कॉफीचे अतिसेवन करू नका. त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.