फोटो सौजन्य: Freepik
सध्या जगभरात कॅन्सर किती वेगाने फैलावत आहे हे सांगण्याची गरज नाही. कॅन्सरचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. यातीलच एक प्रकार म्हणजे लिव्हर कॅन्सर (यकृताचा कर्करोग). लिव्हर कॅन्सरचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा आजार खूप हळू वाढतो आणि जेव्हा तो तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो तेव्हाही कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मग हा आजार नक्की ओळखावा तरी कसा?
जेव्हा आपल्याला लिव्हर कॅन्सर होतो तेव्हा यकृतामध्ये एक ट्यूमर विकसित होते. त्यात एक धोकादायक ट्यूमर असतो जो हळूहळू लिव्हरमध्ये तयार होतो. आपण ते प्रकारांमध्ये विभागू शकता. पहिला हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (HCC) आहे, ज्याला हेपेटोमा असेही म्हणतात. लिव्हर कॅन्सर हिपॅटोसाइट्सपासून सुरू होतो.
लिव्हरमधील पेशींच्या डीएनएमध्ये जेव्हा विविध बदल होतात तेव्हा लिव्हर कॅन्सर होतो. यामुळे पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि कर्करोगाच्या पेशींनी बनलेली गाठ तयार होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, लिव्हर कॅन्सरचे कारण क्रॉनिक हिपॅटायटीस संसर्ग म्हणून ओळखले जाऊ शकतो. काही केसेसमध्ये लिव्हर कॅन्सर अशा लोकांमध्ये विकसित होतो ज्यांना कोणतीही कल्पना नसते. यामुळेच शरीरात पुढील बदल आढळ्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा.
मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या लाइफस्टाइलआणि आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण त्यांना लिव्हर कॅन्सरचा धोका जास्त असतो. जास्त मद्यपान केल्याने यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच जास्त मद्यपान करणाऱ्या लोकांनी सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.