फॅटी लिव्हरचा त्रास आहे कसे समजावे, काय आहे उपाय (फोटो सौजन्य - iStock)
फॅटी लिव्हर हा एक धोकादायक आजार आहे. ते हळूहळू यकृताचे नुकसान करते. शेवटी परिस्थिती इतकी गंभीर होते की मृत्यूचा धोका असू शकतो. दारू हे याचे सर्वात मोठे कारण आहे, पण ते एकमेव कारण नाही. डॉ. प्रियंका शेरावत यांच्या मते, अल्कोहोल व्यतिरिक्त, फॅटी लिव्हरची इतर अनेक कारणे असू शकतात. तथापि डॉक्टरांनी रिव्हर्स करण्याचा मार्गदेखील सांगितला आहे. त्यांनी सकाळी फायबरयुक्त काहीतरी खाण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार कमी होऊ शकतो.
लिव्हरमध्ये चरबी कशी जमा होते?
फॅटी लिव्हरची कारणे
डॉक्टरांनी सांगितले की फॅटी लिव्हरचे एकमेव कारण अल्कोहोल नाही. याशिवाय इतरही अनेक कारणे असू शकतात. जसे मधुमेह, पोटाची चरबी, उच्च रक्तदाब, उच्च ट्रायग्लिसराइड, वाढलेले कोलेस्ट्रॉल इ. या सर्व समस्यांमुळे हा आजार होऊ शकतो. हल्ली बदललेल्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना ही समस्या उद्भवली असल्याचे दिसून येते. त्याचे कारण केवळ अल्कोहोल नाही तर खाण्यापिण्याच्या सवयीदेखील याला कारणीभूत ठऱताना दिसतात.
Fatty Liver करू नका दुर्लक्षित, Grade 2 स्थिती असल्यास टाळा ‘हे’ पदार्थ; वाढेल त्रास
फॅटी लिव्हर असल्याचे कसे समजते?
त्याची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. हे ओळखून, वेळेवर उपचार सुरू करता येतात, ज्यामुळे लवकर आराम मिळेल. अनेकदा पोटात दुखणे, जळजळ होणे आणि अन्नपचन नीट न होणे हे सामान्य संकेतही दिसून येतात. डॉक्टरांच्या मते, यामध्ये SGOT-SGPT नावाचे यकृतातील एंजाइम वाढू लागतात. पोटाच्या वरच्या उजव्या भागात सौम्य अस्वस्थता असू शकते.
काय असावे डाएट
फॅटी लिव्हरच्या रूग्णांनी डाएटमध्ये काय खावे (फोटो सौजन्य – iStock)
दररोज तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि २.५ ते ३ लिटर पाणी प्या. रिफाइंड तेल, रिफाइंड अन्न आणि गोड पदार्थांचे सेवन कमी करावे लागेल. दारूला स्पर्श करू नका. सॅलड, नट आणि बियांमध्ये फायबर असते. सकाळी २ बदाम, २ अक्रोड, ५-६ भोपळ्याच्या बिया खा. हे भिजवून किंवा न भिजवता खाऊ शकता. Fatty Liver असणाऱ्या रूग्णांनी आपल्या डाएटची योग्य काळजी घ्यायला हवी. तसंच आपल्या आहारावर त्यांनी योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
व्यायाम
फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दररोज व्यायाम करण्याची गरज आहे. व्यायामाने ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. तसंच नियमित व्यायाम करण्याने सहनशक्तीदेखील वाढवते आणि रोगांपासून संरक्षण करते. यासाठी, दिवसभर ३० मिनिटे व्यायाम करा किंवा जलद चालण्याचा तुमचा प्रयत्न असू द्या. तुमचे वजन जास्त वाढू देऊ नका.
Fatty Liver सडवून टाकतील 5 पदार्थ, डाएटमध्ये कधीच करू नका समाविष्ट
फॅटी लिव्हर कसे रिव्हर्स करावे?