Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pregnancy Tips: डिलीव्हरीचे दिवस जवळ आले अन् झोप झाली कमी; गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ‘या’ कारणांमुळे वाढतो त्रास

Pregnancy Tips: गर्भावस्थेत पुरेशी झोप मिळणे काही वेळा अवघड होऊ शकते; मात्र हा त्रास सहन करत राहण्याची गरज नाही. झोपण्याची योग्य पद्धत, उशांचा आधार, काही दैनंदिन सवयींमध्ये केलेले छोटे बदल आणि गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गर्भावस्थेतील शेवटचा टप्पा अधिक आरामदायी होऊ शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2026 | 02:55 PM
डिलीव्हरीचे दिवस जवळ आले अन् झोप झाली कमी; गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ‘या’ कारणांमुळे वाढतो त्रास

डिलीव्हरीचे दिवस जवळ आले अन् झोप झाली कमी; गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ‘या’ कारणांमुळे वाढतो त्रास

Follow Us
Follow Us:

Pregnancy Tips: गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात बाळाच्या आगमनाची उत्सुकता वाढत असतानाच अनेक महिलांची रात्रीची झोप मात्र कमी होऊ लागते. वाढलेले पोट, झोपताना आरामदायी स्थिती न मिळणे, वारंवार लघवीला उठणे, पाठदुखी, अॅसिडिटी आणि बाळाच्या हालचाली यामुळे रात्री वारंवार जाग येते. त्यात प्रसूती आणि बाळाच्या आरोग्याबाबतचे विचारही मनात सुरू राहतात. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवत असूनही रात्री पुरेशी झोप मिळत नाही. तिसऱ्या तिमाहीत झोपेचा हा त्रास का वाढतो आणि तो कमी करण्यासाठी गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. याविषयी डॉ. सुश्रुता मोकादम, वरिष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Rabies: कुत्र्याने चावलं नाही, फक्त चाटलं… तरी रेबीजचा धोका? जाणून घ्या धक्कादायक सत्य

गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात झोपेचे चक्र का बिघडते?

पोटाचा वाढता आकार : बाळाची वाढ होत गेल्याने झोपण्यासाठी आरामदायी स्थिती मिळणे कठीण होते. बराच वेळ एकाच स्थितीत झोपल्यास पाठ, कंबर, नितंब किंवा पायांमध्ये अस्वस्थता जाणवू शकते.

वारंवार लघवीला होणे : गर्भावस्थेतील हार्मोन्समधील बदल आणि वाढत्या गर्भाशयाचा मूत्राशयावर येणारा दबाव यामुळे रात्री अनेकदा लघवीला उठावे लागू शकते.

अॅसिडिटी आणि छातीत जळजळ : हार्मोन्समधील बदल आणि पोटावर येणाऱ्या दबावामुळे आम्लपित्त, अपचन किंवा छातीत जळजळ होऊ शकते. विशेषतः जेवल्यानंतर लगेच झोपल्यास हा त्रास वाढू शकतो.

पाठ आणि पायांचा त्रास : गर्भावस्थेत वाढलेले वजन पाठीच्या खालच्या भागावर दबाव आणते. काही महिलांना रात्री पायात गोळे येणे किंवा पाय सतत हलवावेसे वाटणे असा त्रासही होऊ शकतो.

बाळाच्या हालचाली : गर्भातील बाळ काही वेळा अधिक सक्रिय असते. बाळाच्या हालचालींमुळे आईला झोप लागण्यास किंवा लागलेली झोप टिकवून ठेवण्यास अडचण येऊ शकते.

चिंता आणि सतत विचार : प्रसूती कशी होईल, बाळाच्या आरोग्याबाबतची चिंता आणि आई होण्याबाबतचे विचार यामुळे मन शांत होणे कठीण जाते. त्यामुळे शरीर थकलेले असतानाही झोप येत नाही.

चांगली झोप येण्यासाठी काय कराल?

उशीचा आधार घ्या : गर्भावस्थेसाठी असलेली उशी किंवा साध्या उशांचा योग्य वापर करून पोट, पाठ आणि गुडघ्यांना आधार देता येतो. त्यामुळे कुशीवर झोपणे अधिक आरामदायी होऊ शकते.

कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा : गर्भावस्थेच्या पुढील टप्प्यात कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. झोपेत चुकून पाठीवर झोपल्याचे लक्षात आले, तरी घाबरून जाण्याची गरज नाही. हळूच पुन्हा कुशीवर वळावे.

झोपण्यापूर्वी जड जेवण टाळा : रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये पुरेसे अंतर ठेवावे. विशेषतः अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होत असल्यास याकडे अधिक लक्ष द्यावे.

कॅफिनचे सेवन कमी करा : चहा, कॉफी आणि कॅफिन असलेली इतर पेये दिवसाच्या उशिराच्या वेळेत घेतल्यास झोप लागण्यास अडचण येऊ शकते.

मॅग्नेशियमच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या : झोपण्यापूर्वी मॅग्नेशियमची पूरक मात्रा घेण्याचा काही महिलांना फायदा होऊ शकतो. मात्र गर्भावस्थेत कोणतीही औषधं किंवा गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी.

झोपेचे वेळापत्रक ठरवा : दररोज शक्यतो एकाच वेळी झोपणे आणि सकाळी एकाच वेळी उठणे यामुळे शरीराला झोपेची नियमित सवय लागण्यास मदत होते.

झोपण्यापूर्वी मनाला शांत करा : हलके स्ट्रेचिंग, दीर्घ श्वास घेणे, पुस्तक वाचणे किंवा कोमट पाण्याने अंघोळ करणे यामुळे शरीर आणि मनाला आराम मिळू शकतो.

Monsoon Tips: पावसाळ्याच्या ऋतूत गर्भधारणेचे नियोजन करताय? मग, फॉलिक अ‍ॅसिड घ्यायला विसरु नका

गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात झोप कमी होणे सामान्य असले तरी तो खूप जास्त किंवा सतत होत असेल आणि त्याचा परिणाम दिवसभराच्या कामावर होत असेल, तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मोठ्याने घोरणे, झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे, पायांची तीव्र अस्वस्थता, सतत चिंता किंवा दीर्घकाळ झोप न लागणे याकडेही दुर्लक्ष करू नये.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात झोप कमी का होते?

    Ans: पोटाचा आकार वाढणे, पाठदुखी, वारंवार लघवीला लागणे, छातीत जळजळ, पायात गोळे येणे, बाळाच्या हालचाली आणि झोपण्याची योग्य पोझिशन न मिळणे यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

  • Que: प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर रात्री वारंवार लघवी का लागते?

    Ans: गर्भाशय वाढल्यामुळे मूत्राशयावर दबाव पडतो. त्यामुळे गर्भावस्थेच्या शेवटच्या काळात रात्रीही वारंवार लघवीला लागणे सामान्य असू शकते.

  • Que: गर्भावस्थेत झोपण्यासाठी कोणती पोझिशन योग्य असते?

    Ans: गर्भावस्थेच्या उत्तरार्धात अनेक महिलांना बाजूला झोपणे अधिक आरामदायी वाटते. उशा पोटाखाली किंवा गुडघ्यांमध्ये ठेवणेही आराम देऊ शकते. आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या विशेष सूचनांना प्राधान्य द्यावे.

Web Title: Pregnancy tips troubled sleep before delivery know what causes discomfort in the final months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • pregnancy health
  • pregnancy tips
  • women health

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.