
मासिक पाळी दरम्यान स्वच्छता का महत्त्वाची आहे (फोटो सौजन्य - iStock)
दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी ‘लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य जागरूकता दिवस’ म्हणून पाळला जातो. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दरम्यान महिलांनी काही निष्काळजीपणा केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. महिलांमध्ये आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
अस्वच्छ कापड वापरणे किंवा दर ४ ते ६ तासांनी सॅनिटरी पॅड न बदलणे हे संसर्गास आमंत्रण देते. मासिक पाळी दरम्यान योग्य स्वच्छता सवयींचे पालन न केल्यास प्रजनन मार्गाचे संक्रमण, बॅक्टीरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis), ट्रायकोमोनियासिस, कॅन्डिडिआसिस, सिफिलीस, मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय) आणि त्वचेची जळजळ होऊ शकते. याबाबत अधिक माहिती दिली आहे डॉ. दीपाली लोध, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली यांनी.
सावध! कमी वयात मुलींना येतेय मासिक पाळी? पालकांनी ‘या’ गोष्टींकडे द्यावे लक्ष
स्वच्छता का महत्त्वाची
मासिक पाळीदरम्यान होणारे संक्रमण महिलेच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासावरही परिणाम करतात. म्हणूनच स्वच्छतेच्या सवयींचे पालन करणे आणि दीर्घकालीन आरोग्य गुंतागुंत टाळण्यासाठी स्वच्छ पाणी, योग्य उत्पादने आणि मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांची विल्हेवाट लावण्याच्या योग्य पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
योग्य सुविधांचा अभाव, लाज वाटणे, भीती वाटणे किंवा मासिक पाळीशी संबंधित गैरसमजूतींमुळे अनेक मुली मासिक पाळीदरम्यान शाळा चुकवतात. या गैरहजेरीमुळे मुलींच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा येतो आणि करिअरच्या संधींवरही मर्यादा येतात. मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल मुलींना शिक्षित करणे ही काळाची गरज आहे.
मासिक पाळीच्या स्वच्छतेतील आव्हाने
आर्थिक अडचणी लाखो महिलांना स्वच्छता उत्पादने खरेदी करण्यापासून रोखतात आणि त्यांना कापड, चिंध्या, कागद किंवा अगदी गवतासारख्या असुरक्षित पर्यायांचा वापर करण्यास प्रवृत्त करते. हे पर्याय त्यांच्या आरोग्यावर परिणाम करतात. ग्रामीण आणि वंचित भागांमध्ये, स्वच्छता व सुविधा तसेच जागरूकतेचा अभाव महिलांना त्यांच्या मासिक पाळीचे योग्य व्यवस्थापन करण्यास बाधा निर्माण करते आणि त्यांना संसर्गाचा धोका वाढतो.
त्याचप्रमाणे, मासिक पाळीशी संबंधित निषिद्ध गोष्टी महिलांना खुलेपणाने चर्चा करण्यापासून रोखतात, ज्यामुळे लाजिरवाणे वाटणे आणि चुकीची माहितीचा प्रसार होतो आणि महिलांमध्ये अनेकदा मासिक पाळीच्या स्वच्छतेचा अभाव जाणवतो. जागरूकता मोहिमांनी लोकांना सुरक्षित मासिक पाळीच्या पद्धतींबद्दल शिक्षित केले पाहिजे. शाळा आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छता सुविधा आणि परवडणाऱ्या मासिक पाळीच्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे.
वयाच्या ९ किंवा १० वर्षात मासिक पाळी येण्यामागे नेमकी काय आहेत कारण? जाणून घ्या सविस्तर
योग्य मासिक पाळीची स्वच्छता राखण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स